vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मनपाने मुंबईतील कबूतरखान्यांबाबत विशेष अभियान राबवावे– मंत्री उदय सामंत

मनपाने मुंबईतील कबूतरखान्यांबाबत विशेष अभियान राबवावे– मंत्री उदय सामंत

मुंबई, प्रतिनिधी : सध्या मुंबई महापालिकेच्या हद्दीत ५१ कबूतरखाने आहेत. या ठिकाणी कबूतरांमुळे श्वसनविकार, दुर्गंधी व प्रदूषण वाढत असून, यावर नियंत्रण आवश्यक आहे. त्यादृष्टीने कबूतर खाण्यांबाबत तातडीने विशेष ड्राईव्ह घेण्याबाबत मुंबई महापालिकेला आदेश देण्यात येतील असे मंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.

 सदस्य मनिषा कायंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते. यावेळी सदस्य चित्रा वाघ यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला. मुंबईतील कबूतरखाने आणि त्यामुळे होणाऱ्या आरोग्यविषयक त्रासाबाबत मंत्री सामंत यांनी विधानपरिषदेत माहिती दिली.

काही कबूतरखाने न्यायालयाच्या आदेशानुसार बंद करण्यात आले होते असे सांगून मंत्री सामंत म्हणाले की, हे कबूतरखाने पुन्हा सुरू झाल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिकांनी कबूतरांना धान्य टाकणे थांबवावे यासाठी जनजागृती आवश्यक आहे. महापालिकेला एक महिन्यात कबूतरखाने बंद करण्यासाठी विशेष ड्राइव्ह राबवण्याचे आणि जनजागृती मोहिम सुरू करण्याचे निर्देश लवकरच दिले जातील, असेही त्यांनी सांगितले.

००००

संबंधित पोस्ट

हज यात्रेकरूंना स्मार्ट वॉच करून देणार- हज यात्रेकरूंचे पहिले विमान 24 एप्रिल ला रवाना होणार

देहर्जे प्रकल्पबाधितांना भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी मलवाडा पॅटर्न तयार करा – मंत्री गणेश नाईक

पानिपत शौर्य स्मारकाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रमांचे उद्दिष्ट पूर्ण करा_ जिल्हाधिकारी दिलीप स्वामी.

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी यांनी घेतला जिल्ह्यातील महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्या कामकाजाचा आढावा

आंबा-काजू उत्पादक, मच्छीमार आणि शेतकऱ्यांच्या वेदनांची जाणीव ठेवत वाढदिवस साजरा न करण्याचा मंत्री नितेश राणे यांचा निर्णय