vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांना महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन

फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांना महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन

 

मुंबई, प्रतिनिधी: फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांना महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने 6 मार्च 2026 रोजी हॉटेल ताज पॅलेस येथे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात झाले. मुंबईत येणाऱ्या विविध देशाचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान यांच्या स्वागत प्रसंगी सांस्कृतिक सुस्वागतम हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने महादुर्गा, महाकाली व महा सरस्वती दर्शवणारा “जोगवा” हा सांस्कृतिक कार्यक्रम तसेच “नमन” मधील वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक पात्र दर्शवण्यात आले. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्यक्रमात अविभाज्य अंग असणारी “पंढरीची वारी” हा सांस्कृतिक कार्यक्रम फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांच्यासमोर सादर करण्यात आला. या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री ॲड. आशिष शेलार यांची असून या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांचे होते.

संबंधित पोस्ट

राहुरी विधानसभा पोटनिवडणुक-उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर काटेकोर लक्ष ठेवा – खर्च निरीक्षक व्ही. कुमार

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा

नाशिक येथे सीपेट प्रकल्पासाठी महसूल विभागामार्फत विनामोबदला जमीन – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

जिल्ह्यात 1 ते 31 जानेवारी 2026 दरम्यान कर्करोग तपासणी मोहीम कॅन्सर व्हॅनद्वारे होणार मोफत तपासणी

कामोठेत पनवेल महापालिकेचे सर्वात मोठे अग्निशमन केंद्र लवकरच उभारले जाणार

vishwatmaklokswamivarta

अहिल्यानगर जिल्ह्यातील ४४ नागरिकांची एनडीआरएफ कडून यशस्वी सुटका