vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बस स्थानकात १२ तोळे सोन्याची चोरी- जालना जिल्ह्यातील महिला आरोपी ताब्यात-सावंतवाडी पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची संयुक्त कारवाई

बस स्थानकात १२ तोळे सोन्याची चोरी- जालना जिल्ह्यातील महिला आरोपी ताब्यात-सावंतवाडी पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची संयुक्त कारवाई

 

सिंधुदुर्ग प्रतिनिधी-उमेश शेट्ये,सावंतवाडी बसस्थानक येथे १२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरीप्रकरणी सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि सावंतवाडी पोलिस ठाण्याच्या पथकाने संयुक्त कारवाई करत एका महिला आरोपीला जालना जिल्ह्यातील मंठा येथून ताब्यात घेतले.याप्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २५३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत २१ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याच्या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संगीता सुभाष जाधव (वय ३५, रा. संग्राम हॉटेलच्या मागे झोपडपट्टी, मंठा, जि. जालना) हिचा चोरीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले.

त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि सावंतवाडी पोलिसांच्या पथकाने २९ सप्टेंबर रोजी मंठा येथे सापळा रचून आरोपी महिलेला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तिने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.ही कारवाई सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे व पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, हेड कॉन्स्टेबल जॅकसन घोन्सालविस, पोलीस कॉन्स्टेबल अमर कांडर तसेच सावंतवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील, हेड कॉन्स्टेबल शिंदे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल गावकर सहभागी होते.

0000

संबंधित पोस्ट

पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा समन्वय: जालना येथे विशेष प्रशिक्षण शिबिर संपन्न! 🤝🚔

उष्णतेमुळे शाळा सकाळी ७ ते ११ यावेळेत भरणार

शिर्डीत भाविकांची अडवणूक करणाऱ्या एजंटांवर प्रतिबंधात्मक कारवाई-उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी जारी केले आदेश …

vishwatmaklokswamivarta

देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे भारत पर्यटनकडून बी2बी पर्यटन मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर पदी भाजपाच्या नगरसेविका श्री.वंदना अरुण मगरे यांची तर उपमहापौर पदी श्री.राजेश राऊत यांची बिनविरोध निवड झाली आहे..

vishwatmaklokswamivarta

टी. सी. महाविद्यालयातील २५० विद्यार्थ्यांनी घेतली मतदानाची शपथ