vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण..

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण..

        सांगली, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनाच्या ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ गुरुवार, दिनांक 1 मे रोजी सकाळी 8 वाजता पोलीस परेड ग्राऊंड विश्रामबाग, सांगली येथे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

  मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे, यासाठी दि. 1 मे रोजी सकाळी 7.15 ते 9 वाजेपर्यंतच्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला ध्वजारोहण समारंभ आयोजित करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी 7.15 च्या पूर्वी किंवा सकाळी 9 वाजल्यानंतर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांच्या पत्नी व आई वडील यांनी उपस्थित रहावे. ध्वजारोहणाचा समारंभ सुरु होण्यापूर्वी 10 मिनिटे अगोदर उपस्थित रहावे. सुरक्षिततेच्या कारणास्तव कोणतीही पिशवी सोबत आणू नये. अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा यासाठी नागरिकांनी वेबसाईटव्दारे होणारे थेट प्रक्षेपण पहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील 10 नगरपरिषद, 2 नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

vishwatmaklokswamivarta

राज्यातील आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची दिल्लीत बैठक जनऔषधी, क्षयरोग निर्मूलनाला व राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कामाला गती देणार

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी,अद्याप प्रवेश निश्चित न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरीअंतर्गत नोंदणी तसेच भाग-१ मधील आवश्यक दुरुस्ती करण्याची सुविधा ४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजल्यापासून ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध राहील

मिरा भाईंदर अपर तहसिलदार कार्यालयांतर्गत“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान” संपन्न

वृक्षारोपण व संवर्धन सामाजिक जबाबदारी- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्ष उत्पादक आणि वृक्ष खरेदीदार मेळावा.

vishwatmaklokswamivarta

नवरात्रोत्सवात मुंबईकरांसाठी बेस्टची विशेष सुविधा 🚌 २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान महालक्ष्मी मंदिर मार्गांवर अतिरिक्त बसेस धावणार.

vishwatmaklokswamivarta