vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र अण्णाजी उर्फ रामभाऊ जोशी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना वाहिली श्रद्धांजली.

मुंबई, प्रतिनिधी- ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र अण्णाजी उर्फ रामभाऊ जोशी यांच्या निधनाने पत्रकारितेच्या क्षेत्रातील ज्येष्ठ, मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपले आहे. पत्रकारितेच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित वर्गाचे प्रश्न तळमळीने मांडले.  पत्रकारितेच्या माध्यमातून राजकारण, समाजकारणाला दिशा देण्याचे काम केले. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी समाजासाठी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने मराठी पत्रकारितेचा एक अध्याय संपला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी यांच्या निधनानं शेतकरी, कष्टकरी बांधवांशी नाळ जुळलेला, सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी समरस झालेला, लढाऊ पत्रकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. रामभाऊ जोशी यांनी सात शतकाहून अधिक काळ मराठी पत्रकारितेसाठी योगदान दिले. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांसोबत त्यांचा विशेष स्नेह होता. रामभाऊ जोशी यांच्या निधनाने ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला आहे, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

संबंधित पोस्ट

शिवाजी पुतळा येथे सहकार दिंडीचे ध्वजारोहण अर्जुन रावजी खोतकर व राजेश जी टोपे यांच्या हस्ते

vishwatmaklokswamivarta

अभिनेता रणवीर सिंह यांनी श्री चामुंडी दैवाला भूत म्हणून अवमान केल्याचे प्रकरण हिंदु जनजागृती समितीकडून अभिनेता रणवीर सिंह यांच्या विरोधात पोलीस तक्रार !

vishwatmaklokswamivarta

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक !‘मनाचे श्लोक’ नावाचा चित्रपट म्हणजे संत वाड्मयाचा अपमान !चित्रपटाचे नाव न बदलल्यास हिंदू समाज चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही ! – हिंदु जनजागृती समितीचा इशारा

देशाचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी घेतली शपथ, पुढचे १५ महिने राहणार देशाच्या सरन्यायाधीशपदी.

vishwatmaklokswamivarta

बनावट वेबसाइट्स,अप आणि खोट्या ई-चालान लिंकपासून सावध राहा-परिवहन विभागाचे नागरिकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

पनवेल महानगरपालिका आणि इनरव्हिल क्लब आफॅ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्षारोपण कार्यक्रम