*मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्कीट बेंच उद्घाटन सोहळ्याच्या अनुषंगाने कोल्हापूरात वाहतुकीचे नियोजन*
सातारा प्रतिनिधी- कोल्हापूर शहरात कोल्हापूर शहरामधील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयासमोर असलेल्या जुन्या न्यायालयाच्या इमारतीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्कीट बेंचचे प्रत्यक्ष कामकाजास दिनांक 18 ऑगस्ट पासून सुरवात होणार आहे. 17 ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्कीटबेंचचा उद्घाटन सोहळा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर मंत्रीमंडळातील इतर राजकीय नेते यांचे उपस्थित मेरीवेदर ग्राऊंड तसेच छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे समोरील जुन्या न्यायालयाच्या इमारतीमध्ये संपन्न होणार आहे. उद्घाटन कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्हा तसेच आजुबाजूचे जिल्ह्यातील राजकीय, सामाजीक, प्रतिष्ठित व्यक्ती, वकिल तसेच इतर क्षेत्रामधील व्यक्ती उपस्थित राहणार असलेने सदर परिसरामध्ये लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे परिसरातील वाहतुक सुरळीत व सुरक्षित रहावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये. सामान्य जनतेस नियमित व्यवहार पार पाडण्यास अडसर निर्माण होवु नये याकरीता सदर मार्गावरील रहदारी नियमनबाबत कोल्हापूर पोलीस अधीक्षक यांनी खालीलप्रमाणे निर्देश दिलेले आहेत.
सर्कीटबेंच न्यायालय इमारत येथील कार्यक्रम दरम्यान वाहतूकीसाठी आवश्यकते नुसार पोलीस वाहन, फायर बिग्रेड व अॅम्ब्युलन्स वाहने वगळून प्रवेश बंद करण्यात अगर वळविण्यात आलेले मार्ग पुढीलप्रमाणे
सीपीआर कडून भवानी मंडपकडे जाणारी वाहने शिवाजीपूल अगर दसरा चौक मार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ होतील. शिवाजीपुल ते सीपीआर चौकाकडे येणारी वाहने शिवाजीपुल येथून गंगावेश मार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ होतील. दाभोळकर कडून सीपीआर चौकाकडे येणारी वाहने व्हिनस कॉर्नर येथून फोर्ड कॉर्नर/कोंडाओळ मार्गे सोयीनुसार मार्गस्थ होतील. भवानी मंडप कडून सीपीआर चौकाकडे येणारी वाहने माळकर तिकटी, लुगडी ओळ मार्गे सोयीनुसार मार्गस्थ होतील. माळकर चौकाकडुन सारस्वत बँक चौक तसेच शनीवार पोष्ट ऑफिस चौकाकडे जाणेस प्रवेश बंद करण्यात येत आहे. मराठा बँक, शनिवार पोस्ट ऑफीस कडून येणा-या सर्व वाहनांना शनिवार पोस्ट ऑफीस चौकातून सीपीआर कडे येण्यास प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदर वाहन चालकांनी सोयीनुसार पर्यायी मार्गचा वापर करावा. फुलेवाडी नाक्याकडुन रंकाळा टॉवर दिशेने येणारी वाहने फुलवाडी नाका, नविन वाशी नाका, साई मंदिर चौक मार्गे पुढे मार्गस्थ होतील. रंकाळा टॉवर, जॉकी बिल्डींग येथुन शहरात प्रवेश करण्यास प्रवेश बंद करण्यात येत आहे. त्याठिकाणाहुन वाहनधारकांनी देवकर पाणंद, संभाजीनगर मार्गे पुढे मार्गस्थ व्हावे.
मेरीवदेर ग्राऊड येथील कार्यक्रम दरम्यान वाहतूकीसाठी आवश्यकते नुसार प्रवेश बंद करण्यात अगर वळविण्यात आलेले मार्ग पुढीलप्रमाणे
सीपीआर कडून पोस्ट ऑफीस चौकाकडे जाणारे वाहनांना महावीर कॉलेज येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे सदर वाहनांनी खानिवलकर पेट्रोल व जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे पुढे सोयीनुसार मार्गाचा वापर करण्याचा आहे. कसबा बावडा चौकातून सीपीआर चौकाकडे जाणारे वाहनांना पोलीस अधीक्षक चौकामध्ये प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदर वाहन चालकांनी लाईन बाझार या पर्यायी मार्गाचा सोयीनुसार मार्गाचा वापर करण्याचा आहे. महासैनिक दरबार येथील कार्यक्रम दरम्यान वाहतूकीसाठी आवश्यकते नुसार प्रवेश बंद करण्यात अगर वळविण्यात आलेले मार्ग पुढीलप्रमाणे –
कसबा बावडा येथून सर्कीट हाऊसकडे जाणारे वाहनांना लाईन बझार येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदर वाहन चालकांनी चार नंबर फाटक, पोलीस अधीक्षक चौकातून पुढे सोयीनुसार मार्गस्थ होतील. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून धैर्यप्रसाद मार्ग लाईन बझार कडे जाणारे वाहनांना धैर्यप्रसाद हॉल चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदर वाहन चालकांनी पितळी गणपती अगर सदर बाजार रोडने पुढे सोयीनुसार मार्गस्थ होतील.
VVIP यांचे मार्गावर शिथील करण्यात येणारे वन वे मार्ग -दुर्गा चौक ते खॉसाब पुतळा चौक हा वन वे मार्ग व्हिव्हिआयपी यांचे कॅन्वाय मधील सर्व वाहनाकरीता मार्गक्रमण दरम्यानचे मुदतीत करीता शिथील करण्यात येत आहे. मिरजकर तिकटी ते बिनखांबी हा वन वे मार्ग व्हिव्हिआयपी यांचे कॅन्वाय मधील सर्व वाहनाकरीता मार्गक्रमण दरम्यानचे मुदतीकरीता शिथील करण्यात येत आहे. VVIP संपुर्ण दौरा मार्गावरील वाहतूक कॅन्वाय मार्गक्रमण करीत असताना आवश्यकतेनुसार थांबविण्यात अगर वळविण्यात येईल.
एस.टी. व केएमटी बसेस करीता सुरक्षिततेचे कारणास्तव वळविण्यात आलेला वाहतूक मार्ग पुढीलप्रमाणे -सर्कीट बेंच उद्घाटन सोहळा अनुषंगाने सीपीआर चौक, मेरीवेदर ग्राऊड या ठिकाणचे मार्गावर येणार नाहीत. मध्यवर्ती बसस्थानक येथून शाहुवाडी मार्गे कोकणात जाणारे एस.टी. बसेस हया VVIP यांचे संपुर्ण दौरा कालावधीत मध्यवर्ती बसस्थानक येथून दाभोळकर कॉर्नर व्हिनसकॉर्नर येथून डावीकडे वळून फोर्ड कॉर्नर- उमा टॉकीज – सावित्रीबाई फुले हॉस्पीटल यल्लमाओढा चौक हॉकी स्टेडिअम संभाजीनगर क्रेशर चौक- रंकाळा टॉवर- रंकाळा स्टैंड- गंगावेश, शिवाजीपुल मार्ग मार्गस्थ होतील अगर आवश्यकता वाटलेस त्यांनी तावडे हॉटेल, सांगली फाटा या मार्गाचा वापर करुन सादळे मादळे मार्गे कोकणामध्ये मार्गस्थ होतील. शाहुवाडी येथून कोल्हापूर मध्ये प्रवेश करणा-या एस.टी. बस या वडणगे फाटा निगवे, भुये शिये- हायवे रोडने मध्यवर्ती बस स्थानक साठी पुढे मार्गस्थ होतील. कसबा बावडा येथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकाकडे जाणारे केएमटी बस चालक यांनी लाईन बझार -धैर्यप्रसाद चौक – ताराराणी पुतळा दाभोळकर चौक व्हिनसकॉर्नर-फार्ड कॉर्नर- महाराणा प्रताप चौक मार्गे मार्गस्थ होतील. छत्रपती शिवाजी पुतळा चौकाकडून कसबा बावडा कडे जाणारे केएमटी बस चालक यांनी माळकर तिकटी -लुगडी ओळ – व्हिनस कॉर्नर दाभोळकर चौक ताराराणी पुतळा धैर्यप्रसाद चौकातून लाईन बझार मार्गे मार्गस्थ होतील. सर्किट बेंच उद्घाटन कार्यक्रम अनुषंगाने पार्कीग ठिकाणे – व्हिनस कॉर्नर येथील गाडी अडडा(दुचाकी- चारचाकी), चार चाकी वाहनांकरीतादसरा चौक, १०० फुटी रोड खानविलकर पेट्रोल पंप जवळ, महाराणी लक्ष्मीबाई जिमखाना, दुचाकी- चारचाकी वाहनांकरीता शहाजी महाविद्यालय, पंचायत समिती कार्यालय
मेरीवदेर ग्राऊड येथील कार्यक्रमांचे अनुषंगाने पार्कीग ठिकाणे :- व्हीआयपी पार्कींगकरीता मेरी वेदर ग्राऊंड, सेंट झेवियर्स हायस्कूल, इतर वाहनाकरीता विवेकानंद कॉलेज, समादेशक, होमगार्ड मुख्यालय, कोल्हापूर, मा. जिल्हा व सत्र न्यायालय, पार्कीग जागा, प्रशासकीय इमारत, सर्कीट हाऊस समोरील जागा, महासैनिक दरबार हॉल पोलीस मुख्यालय गेट जवळील जागा, न्यु पॅलेस येथील पार्कींग (राखीव) पार्किंग ठिकाणी जाणेचा मार्ग व पार्कीग सुविधा – कार्यक्रमाकरीता इतर जिल्हयातुन येणारे वकील यांचे वाहनांकरीता मार्ग व पार्कीग व्यवस्था खालील प्रमाणे राहील.सांगली – सांगली फाटा येथुन उजवीकडे वळुन शिये, कसबा बावडा मार्गे- पोलीस परेड ग्राउंड सातारा-शिये, कसबा बावडा मार्गे -पोलीस परेड ग्राउंड
कोल्हापूर- व्हिव्हिआयपी कॅन्वाय मार्ग वगळून इतर मार्गावरुन- जिल्हा व सत्र न्यायालय रत्नागिरी, सिंधुदुर्ग- वडणगे फाटा, निगवे, भुये, शिये, का बावडा मार्गे- महासैनिक दरबार हॉल
सोलापूर जिल्हा- सांगली फाटा येथुन उजवीकडे वळुन शिये, कसबा बावडा मार्गे-मध्यवर्ती प्रशासकीय इमारत
बार असो. पदाधिकारी- व्हिव्हिआयपी कॅन्वाय मार्ग वगळून इतर मार्गावरुन- न्यु पॅलेस राखीव सर्व मार्ग दि. 17 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वा. पासुन मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्कीट बेंचचे उद्घाटन सोहळा संपन्न होईतोपर्यंत वरील प्रमाणे प्रवेश बंद व वाहतूक मार्ग वळविणेत आलेले आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे, शहर वाहतूक नियंत्रण शाखा, कोल्हापूर यांनी कळविले आहे.