vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सोलापूर-पुणे-मुंबई हवाई मार्गासाठी प्रति आसन व्यावहारिक तूट निधी देण्याचा निर्णय-मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता….

सोलापूर-पुणे-मुंबई हवाई मार्गासाठी प्रति आसन व्यावहारिक तूट निधी देण्याचा निर्णय-मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता….

राज्य प्रतिनिधी-सोलापूर-पुणे-मुंबई हवाई मार्गासाठी उडान योजनेच्या धर्तीवर एक वर्षासाठी प्रति आसन व्यावहारिक तूट (व्हायअबिलिटी गॅप फंडिंग- व्हीजीएफ) निधी उपलब्ध करून देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

केंद्र शासनाने सामान्य नागरिकांना विमानप्रवास परवडेल यादृष्टीने उडान (रिजनल कनेक्टिव्हिटी स्किम) योजना सुरू केली आहे. सोलापूर विमानतळासाठीदेखील ही योजना लागू होणार आहेत. ही योजना लागू होईपर्यंत वर्षभरासाठी प्रति आसन ३ हजार २४० रुपये दराने (शंभर टक्के व्हिजीएफ) व्यावहारिकता तूट म्हणून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवास दर कमी होण्यास मदत होणार आहे.

या निर्णयानुसार सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-पुणे या हवाई मार्गासाठी स्टार एअर कंपनीस दर आसनामागे हा व्यावहारिक तूट निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याकरीता १७ कोटी ९७ लाख ५५ हजार २०० रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.

या विमानतळासाठी उडान योजना लागू झाल्यानंतर शासनाकडून देण्यात येणारा हा निधी बंद करण्यात येईल व केंद्र शासनाच्या उडान योजनेप्रमाणे २० टक्के व्यवहारिकता तूट (व्हिजीएफ) देण्यात येणार आहे.

000000

संबंधित पोस्ट

राज्यात गणेशोत्सव होणार आता राज्य महोत्सव- सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार

खोपोली येथे विशेष वित्तीय समावेशन शिबिर संपन्न रिझर्व्ह बँक अधिकाऱ्यांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

स्वतः डिजिटल व्हा आणि घरच्यांना डिजिटल साक्षरतेचे धडे द्या : राहुल पाटील#राष्ट्रीयग्राहकदिन जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा

🎉 जालना महानगरपालिकेचा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा

वेध विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचे जिल्हाधिका-यांकडून पूर्वतयारीचा आढावा.

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू