vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेश

8 एप्रिल रोजी दुसऱ्या विशेष डिजिटल शेती शाळेचे आयोजन ; कृषि विभाग व पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित

8 एप्रिल रोजी दुसऱ्या विशेष डिजिटल शेती शाळेचे आयोजन ; कृषि विभाग व पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित

 

नांदेड प्रतिनिधी – नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत अभियान स्वरूपात राबविण्यात येणाऱ्या ‘हवामान अनुकूल तंत्रज्ञान” बाबत कृषि विभाग व पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने एप्रिल 2026 मध्ये चार विशेष डिजिटल शेती शाळा घेण्यात येणार आहेत. यामध्ये पहिली डिजिटल शेतीशाळा 1 एप्रिल रोजी संपन्न झाली असून दुसरी डिजिटल शेतीशाळा बुधवार 8 एप्रिल रोजी आयोजित केली असून, या डिजिटल शेती शाळांमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा. तसेच प्रत्येक गावातील शेतक-यांनी डिजिटल शेतीशाळेसाठी आपल्या घरातून ऑनलाईन उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नांदेड यांनी केले आहे

पाणी फाउंडेशन द्वारे संचलित डिजिटल शेती शाळा हे एक ऑनलाईन व्यासपीठ आहे. जिथे तज्ञांमार्फत शेतकऱ्यांना शास्त्रोक्त आणि पीक निहाय उत्तम पद्धतींचे मार्गदर्शन झूम आणि युट्युबच्या माध्यमातून दिले जाते.

दिनांक १ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या डिजिटल शेतीशाळेच्या पहिल्या सत्रात शेतक-यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आता पुढील सत्र भाग 2 मध्ये जैविक/नैसर्गिक निविष्ठा उत्पादन- बीजामृत, जीवामृत, घन जीवामृत, लींबोळी अर्क, दशपर्णी अर्क उत्पादन बाबत नियोजित बुधवार ८ एप्रिल २०२६ रोजी मार्गदर्शन मिळणार आहे. या सत्रात शेतकऱ्यांना घरच्या घरी विविध उपयुक्त निविष्ठा तयार करण्याचे प्रगत तंत्रज्ञान शिकायला मिळेल जसे की, बिजामृत, जिवामृत, लिंबोळी अर्क, दशपर्णी अर्क. तसेच, या निविष्ठांचे फायदे आणि त्यांचा योग्य वापर कसा करावा याबाबत सखोल मार्गदर्शन दिले जाईल.

तरी शेतकरी बंधू-भगिनी, शेतकरी गट, FPOs आणि महिला बचत गटांनी या सुवर्णसंधीचा नक्की लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आपल्या सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. चला, तर मग हवामान बदलाला सामोरे जात, आपल्या शेतीला अधिक शाश्वत आणि समृद्ध बनवूया!

 सदरील शेतीशाळेस कृषि विभाग अंतर्गत उप कृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, समूह सहाय्यक, कृषी ताई व कृषी सखी तसेच पशुसंवर्धन विभाग अंतर्गत पशुसंवर्धन विकास अधिकारी, पशुसंवर्धन पर्यवेक्षक व पशुसखी हे उपस्थित राहतील. तसेच प्रत्येक गावात एका मध्यवर्ती ठिकाणी शेतकरी एकत्रित उपस्थित राहतील असे नियोजित आहे.

शेती शाळा नियोजित दिनांक दिवशी सायंकाळी ७.३० वाजता सुरू करण्यात येणार आहेत. तसेच सदर डिजिटल शेतीशाळा खाली दिलेल्या यु ट्यूब चॅनेल द्वारे आपण डिजिटल शेती शाळा बघू शकता- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प- https://www.youtube.com/live/mEgTBeO_yP8?si=0M2ezKHv6OmCUOWf

कृषी विभाग महाराष्ट्र शासन- https://www.youtube.com/live/2JKciiYL0I?si=l21CrYi7oyDEk3Xu

पाणी फाउंडेशन- https://www.youtube.com/live/nF-20hUunAo?si=iE-MYbPJ21SCCWiH

00000

संबंधित पोस्ट

निराधार, श्रावणबाळचे पैसे तात्काळ वितरीत करावेत-उपमुख्यमंत्री अजित पवार

कौटूंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा सांगली जिल्हा दौरा

आनंदवनाशी जुळलेल्या सर्वांना आत्मिक समाधान मिळते त्यामुळेच #आनंदवन हे खऱ्या अर्थाने मानवतेचे मंदीर आहे, अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्व. #बाबाआमटे आणि साधनाताई आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या ७५ वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्यात व्यक्त केल्या.

vishwatmaklokswamivarta

वारणा धरणात 27.88 टी.एम.सी. पाणीसाठा

जातीचे दाखले तयार करण्यासाठीआयोजित विशेष शिबीराचा लाभ घ्या  – तहसिलदार अश्विनी वरूटे

vishwatmaklokswamivarta