vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

7 एप्रिल रोजी जिल्ह्यात ‘जागतिक आरोग्य दिन’ होणार साजरा – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख “एकत्रित प्रयत्न आरोग्यासाठी, विज्ञानाची साथ भविष्यासाठी!” या घोषवाक्यासह आरोग्य जनजागृतीवर भर

7 एप्रिल रोजी जिल्ह्यात ‘जागतिक आरोग्य दिन’ होणार साजरा – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख “एकत्रित प्रयत्न आरोग्यासाठी, विज्ञानाची साथ भविष्यासाठी!” या घोषवाक्यासह आरोग्य जनजागृतीवर भर

आरोग्य प्रतिनिधी-नांदेड :- दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ७ एप्रिल हा दिवस ‘जागतिक आरोग्य दिन’ म्हणून संपूर्ण नांदेड जिल्ह्यात साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी जागतिक आरोग्य दिनासाठी “Together for health. Stand with science” आणि मराठीत “एकत्रित प्रयत्न आरोग्यासाठी, विज्ञानाची साथ भविष्यासाठी!” हे घोषवाक्य निश्चित करण्यात आले आहे.

या दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात “माझे गाव आरोग्य संपन्न गाव” या संकल्पनेवर आधारित विविध आरोग्य कार्यक्रम आणि शिक्षण उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात व्यापक जनजागृती केली जाणार आहे.

जिल्ह्यात राबविले जाणारे प्रमुख उपक्रम:जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि जिल्हा रुग्णालय प्रशासनामार्फत खालील उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

आरोग्य प्रभात फेरी व आरोग्य दिंडी: गावागावातून आरोग्याचा संदेश देण्यासाठी प्रभात फेऱ्या काढण्यात येतील.चर्चासत्रे व जनजागृती: आरोग्य विषयावर तज्ज्ञांची चर्चासत्रे आणि जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जातील.आरोग्य शिबिरे: नागरिकांच्या तपासणीसाठी विविध ठिकाणी विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येईल.

ग्रामपातळीवर उपक्रम : ग्रामपंचायतींमध्ये ‘आरोग्य सभा’ घेऊन समुदाय आधारित गटचर्चा व समुपदेशनावर भर दिला जाईल. प्रचार-प्रसिद्धी: सोशल मीडिया, स्थानिक माध्यमे, वृत्तपत्र लेख आणि यशोगाथांच्या माध्यमातून आरोग्य योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यात येईल.

उपसंचालक आरोग्य सेवा, पुणे यांनी दिलेल्या सूचनेनुसार, जिल्ह्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमांचे जिल्ह्यात प्रभावी नियोजन करण्यात येत आहॆ.. “माझे गाव आरोग्य संपन्न गाव” ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांनी केले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

शिवसाई आश्रमशाळेत ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी ;डेंग्यू, हिवताप प्रतिबंधाबाबत जनजागृती; स्वच्छता व वैयक्तिक आरोग्याबाबत मार्गदर्शन

ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालयांतस्वातंत्र्यदिनी तंबाखूमुक्तीची शपथ द्यावी – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची सूचना

तालुका : कन्नड माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव व सेवा संकल्प अभियानांतर्गत साथकुंड येथे माता-बालक आरोग्य तपासणी

vishwatmaklokswamivarta

जिल्हा आरोग्य विभागाकडून गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमाला गतीNQAS अंतर्गत आरोग्य सेवांची गुणवत्ता उंचावण्यावर भर; ४ प्राथमिक आरोग्य केंद्रांना मानांकन प्रमाणपत्र प्राप्त

टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत गडचिरोलीत क्षयरोग जनजागृती रॅली*‘जोष टीम’च्या माध्यमातून एनसीसी कॅडेट्स व माय भारत स्वयंसेवकांचा जनजागृतीत सहभाग*

vishwatmaklokswamivarta

बाल स्वास्थ्य कार्यक्रमात 879 बालकांना जीवदान *4 हजार 547 इतर शस्त्रक्रिया यशस्वी…