vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी दीक्षाभूमीवर चोख सोयी-सुविधा द्या प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांचे निर्देश विभागांनी समन्वयाने नियोजन करण्याचे आवाहन

धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी दीक्षाभूमीवर चोख सोयी-सुविधा द्या प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांचे निर्देश विभागांनी समन्वयाने नियोजन करण्याचे आवाहन

नागपूर, प्रतिनिधी: नागपूर येथील दीक्षाभूमीवर २० ऑक्टोबर रोजी साजरा होणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन हा देशभरातील अनुयायांसाठी महत्त्वाचा सोहळा आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या लाखो अनुयायांना आवश्यक सोयी-सुविधा वेळेत आणि सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी परस्पर समन्वयाने सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिले.विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला प्रभारी विभागीय आयुक्त तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस उपायुक्त संदीप पखाले, आदित्य मिरखेलकर, सिंगा रेड्डी, समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुलकर्णी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार अनुयायांच्या सोयी-सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित करून महोत्सवाचे नियोजन करावे, असे डॉ. कांबळे यांनी सांगितले.

यावेळी समाज कल्याण विभागाच्या वतीने अनुयायांसाठी करण्यात येणाऱ्या सुविधांचे सादरीकरण करण्यात आले. दीक्षाभूमी परिसरात निवासासाठी जर्मन हँगर तंत्रज्ञानावर आधारित निवारा कक्ष उभारण्यात येणार असून, त्यामध्ये पंखे, कुलर्स, प्रकाशयोजना तसेच अंथरूण-पांघरूणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. या निवारा कक्षांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याशी संबंधित नावे देण्यात येणार आहेत. निवारा कक्षांच्या परिसरात संविधान साहित्याची ‘भीमसृष्टी’ उभारण्यात येणार आहे. तसेच तक्रार निवारण केंद्र, महिलांसाठी हिरकणी कक्ष, बालकांसाठी खेळण्याची जागा आदी व्यवस्था करण्यात येणार आहे.

अनुयायांच्या आरोग्याच्या दृष्टीने औषधसाठा, वैद्यकीय कक्ष, मोबाईल रुग्णालये आणि रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात येणार आहे. महिला, बालके आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून देण्यात येतील. स्वच्छतेसाठी नियमित स्वच्छता, जंतुनाशक व डास प्रतिबंधक फवारणी, मोबाईल स्वच्छतागृहे आणि कचराकुंड्यांची पुरेशी व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

अनुयायांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त, महिला सुरक्षा पथक, अग्निशमन दल आणि नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवण्यात येणार आहे. तसेच अनुयायांना आवश्यक माहिती मिळावी यासाठी हेल्पलाइन क्रमांक, दिशादर्शक नकाशे आणि उद्घोषणा प्रणालीची व्यवस्था करण्यात येणार आहे. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा सुरळीतपणे पार पाडावा, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

०००

संबंधित पोस्ट

वक्फ वाचवा’ परिषद जालन्यात आज शनिवार*वक्फ कायद्यातील दुरुस्त्यांविरोधात इस्लामी विद्वानांचा आवाज*

लडाखमध्ये भूकंपाचा धक्का! लेह परिसरात रिश्टर स्केलवर ५.५ तीव्रतेची नोंद..

द्रमुक सरकार उलथवुन टाका – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* तामिळनाडुत रिपब्लिकन पक्षाचे 18 उमेदवार निवडणुक रिंगणात*   

जिल्हा कारागृहात मार्गदर्शक शिबीर संपन्न

धुळे व नंदुरबार जिल्ह्याला शौर्य आणि बलिदानाचा गौरवशाली वारसा धुळ्यातील नूतन शहीद स्मारक त्यांच्या बलिदानाची आठवण करुन देईल : पालकमंत्री जयकुमार रावल

vishwatmaklokswamivarta

एटापल्लीचा मशरूम प्रकल्प जोमात; उत्पादनाला बाजारपेठेत उत्स्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद*“स्थानिक मशरूम खरेदी करून उपक्रमाला साथ द्या” – महिला बचत गटांचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta