vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वक्फ वाचवा’ परिषद जालन्यात आज शनिवार*वक्फ कायद्यातील दुरुस्त्यांविरोधात इस्लामी विद्वानांचा आवाज*

वक्फ वाचवा’ परिषद जालन्यात आज शनिवार*वक्फ कायद्यातील दुरुस्त्यांविरोधात इस्लामी विद्वानांचा आवाज*

*जालना*:*(प्रतिनिधी)* नुकत्याच मंजूर करण्यात आलेल्या वक्फ (सुधारणा) कायद्याविरोधात जनजागृती आणि जनमत तयार करण्याच्या उद्देशाने, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या ताहाफ्फुज-ए-अवकाफ समितीच्या वतीने जालना येथे शनिवारी, २८ जून रोजी सायंकाळी ६ ते १० या वेळेत जुन्या जालना ईदगाह मैदानावर भव्य ‘वक्फ वाचवा’ परिषद आयोजित करण्यात आली आहे.

संयोजकांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, या परिषदेचे उद्दिष्ट वक्फ कायद्यातील दुरुस्त्यांचे परिणाम लोकांसमोर मांडणे व देशभरातील वक्फ मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी सामूहिक कृतीची रणनीती ठरवणे हे आहे.या परिषदेच्या अध्यक्षस्थानी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे अध्यक्ष खालिद सैफुल्लाह रहमानी असतील. खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार राजेश टोपे, माजी आमदार कैलास गोरणट्याल, शिवसेना जिल्हा अध्यक्ष भास्कर अंबेकर आणि डॉ. संजय लाखे पाटील हे देखील या परिषदेच्या उपस्थितीत राहणार आहेत.बोर्डच्या तसेच अन्य प्रमुख इस्लामी संघटनांचे अनेक मान्यवर वक्ते यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.

 त्यामध्ये मौलाना फजलुर रहीम मुजद्दिदी (महासचिव, बोर्डच्या ), मौलाना उमरैन महफूज रहमानी (सचिव, बोर्डच्य), इलियास खान फलााही (अध्यक्ष, जमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र ), मौलाना असगर अली मेहदी (उपाध्यक्ष), मौलाना हलीमुल्लाह कासमी (अध्यक्ष, जमीयत उलेमा अरशद मदनी – महाराष्ट्र), मौलाना हाफिज मोहम्मद नदीम सिद्दीकी (अध्यक्ष, जमीयत उलेमा महमूद मदनी – महाराष्ट्र), जियाउद्दीन सिद्दीकी (अध्यक्ष, वहदत-ए-इस्लामी हिंद), अ‍ॅड. अझहर तांबोळी (अध्यक्ष, SDPI) यांचा समावेश आहे.तसेच बोर्डच्या चे सदस्य मलिक मोअतासिम खान, महफूज-उर-रहमान फारुकी, मुफ्ती मोईजुद्दीन कासमी, रफिउद्दीन अशरफी हेही या परिषदेचे मार्गदर्शक वक्ते असतील.ही माहिती परिषदेचे समन्वयक मौलाना अब्दुल रऊफ नदवी यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे

संबंधित पोस्ट

जिल्हा प्रशासनाचा अनोखा उपक्रम #‘ई-टपालवाला सेवा’जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हॉट्सअ‍ॅपवर नागरिकांना आता मिळणार जलद माहिती..

पालघरमध्ये मासेमारीसाठी गेलेल्या 9 बोटी अद्याप परतल्या नाहीत …

फिनटेक उद्योजकांनी घेतली राज्यपालांची भेट

vishwatmaklokswamivarta

पूरसदृश्य परिस्थितीमुळे जिल्ह्यात 129 कुटुंबातील 361 नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर**वाहतूकीवर परिणाम होणारे रस्ते बंद**नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन*

राज्य क्रीडा दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यात-विविध क्रीडा उपक्रम राबविण्याचे आवाहन

भारतीय हवामान खात्याच्या  जाहीर केलेल्या पाच दिवसीय अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २० ते २४ एप्रिल या कालावधीत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता