vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशराजकारण

शिक्षक मतदारसंघाच्या नव्याने मतदार नोंदणीसाठी 6 नोव्हेंबरपर्यंत मुदत;पात्र शिक्षकांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन

शिक्षक मतदारसंघाच्या नव्याने मतदार नोंदणीसाठी 6 नोव्हेंबरपर्यंत मुदत;पात्र शिक्षकांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन

बुलडाणा, प्रतिनिधी शिक्षक मतदारसंघासाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. या अनुषंगाने 1 जानेवारी 2025 हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला असून, शिक्षक विधानपरिषद मतदारसंघातील सर्व पात्र शिक्षकांनी नव्याने मतदार यादीत नाव नोंदणीसाठी 6 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांनी केले आहे.

या कालावधीत पात्र मतदारांनी आपली नावे नोंदवून घेणे अत्यावश्यक असून, कोणताही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये, याची दक्षता स्वतः मतदारांनी घ्यावी. मतदार नोंदणीसाठी पात्र व्यक्तींनी नमुना क्रमांक 19 मध्ये अर्ज सादर करावा. मतदार नोंदणी नियम, 1960 च्या नियम 31 (4) नुसार प्रसिद्ध करण्यात आलेल्या नोटीशीची प्रथम पुर्नप्रसिद्धी 15 ऑक्टोबर 2025 रोजी करण्यात आली आहे. सदर नोटीस जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पंचायत समित्या, नगरपरिषद कार्यालये तसेच संबंधित संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यासंबंधीचा सविस्तर तपशील मुख्य निवडणूक अधिकारी तसेच विभागीय आयुक्त कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे.

 

000000

संबंधित पोस्ट

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक!**धार येथील ‘भोजशाळा’ हे हिंदू मंदिरच; मंदिरमुक्तीच्या लढ्याला आणखी एक ऐतिहासिक यश . अब काशी-मथुरा बाकी है’ – हिंदु जनजागृती समिती

उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक जाहीर; १८ जून रोजी मतदान, तर २२ जूनला होणार मतमोजणी..

नववर्ष प्रण-सुरक्षित अन्न’ मोहिमेचा समारोप;दर्जेदार रेस्टॉरंट्सचा जिल्हाधिकारी  आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरव

🇮🇳*’हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत गडचिरोलीत मॅरेथॉन व जनजागृती रॅली*

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत ७ मार्च रोजी लातूर तालुक्यात हरंगुळ मंडळातील टाकळी (शि) येथे समाधान शिबीर

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य दुर्गम भागात पोहोचवणार – न्यायमूर्ती भूषण गवई

vishwatmaklokswamivarta