vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२३ ची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२३ ची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर…

राज्य प्रतिनिधी -मुंबई,: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ च्या अर्हता प्राप्त उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे.

दि. ४ मार्च ते ९ मे २०२५ या कालावधीत नवी मुंबई केंद्रावर उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. यानंतर आयोगाने सदर यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. ही यादी तात्पुरती असून, अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्र पडताळणी अंती उमेदवारांच्या गुणवत्ताक्रमात बदल होऊ शकतो किंवा काही उमेदवार अपात्र ठरू शकतात.

या यादीवर अंतिम निर्णय विविध न्यायप्रकरणांवरील न्यायालयीन निकालांवर अवलंबून असेल. उमेदवारांनी आपला पद पसंतीक्रम दिनांक १० ते १६ मे २०२५ दरम्यान आयोगाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन सुविधेमार्फत नोंदवणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी पसंतीक्रम नोंदवताना आयोगाने अधिसूचित केलेल्या सात संवर्गांपैकी निवड करावी, अन्यथा ‘No Preference’ विकल्प निवडावा. एकदा सादर केलेला पसंतीक्रम कालावधी नंतर बदलता येणार नाही. तसेच, पसंतीक्रम नोंदवले नसल्यास उमेदवारांच्या शिफारशीचा विचार केला जाणार नाही.

संबंधित पोस्ट

जमीन न मिळालेल्या कोयना धरणग्रस्तांनी जमिनीसाठी अर्ज करावे – पालकमंत्री शंभूराज देसाई

विरार-डहाणू रेल्वे चौपदरीकरणातील बाधितांना सानुग्रह अनुदान द्यावे – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे मिहान प्रकल्पातील पुनर्वसन धोरणानुसार नियोजन करुन सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार प्रदान प्रा.जयंत विष्णू नारळीकर यांचा मरणोत्तर विज्ञान रत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान

vishwatmaklokswamivarta

बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाकडून सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकता नगर, गुजरात येथे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’वर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त पुष्पांजली अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली

vishwatmaklokswamivarta

शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा संपन्न परिपाठ ते गृहपाठ पर्यंत विद्यार्थ्यांना कौशल्यविकासाची संधी द्या. – जिल्हाधिकारी- डॉ. किरण पाटील