vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जमीन न मिळालेल्या कोयना धरणग्रस्तांनी जमिनीसाठी अर्ज करावे – पालकमंत्री शंभूराज देसाई

जमीन न मिळालेल्या कोयना धरणग्रस्तांनी जमिनीसाठी अर्ज करावे – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा प्रतिनिधी: कोयना धरणामध्ये जमिन गेली आहे परंतु अद्यापपर्यंत जमिन मागणीसाठी अर्ज केला नाही अशा धरणग्रस्तांनी जमिन मागणीचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा. महसूल प्रशासनाने पसंतीच्या जमिनी दाखविण्यासाठी विशेष शिबीराचे आयोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

पालकमंत्री कार्यालयात कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसन व महिंद प्रकल्प ग्रस्तांना भूखंड वाटपाबाबत आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी घेतला. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोणपे, अतुल म्हेत्रे, तहसीलदार अनंत गुरव, धरणग्रस्त उपस्थित होते.

कोयना धरणग्रस्तांचे मुळ मालक हयात नाही अशांच्या वारसांनी अर्ज करावेत, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, ज्यांना अद्याप पर्यंत जमिनींचे वाटप झाले नाही अशांनी तात्काळ जमिनीची पसंती सांगावी. ज्या धरणग्रस्तांकडे कागदपत्रे नाही अशांना प्रशासनाकडील उपलब्ध असेलेली कागदपत्रेही देण्यात येतील. कोयना धरणग्रस्तांना सुलभपणे प्रकल्पग्रस्तांचे दाखल मिळावे यासाठी नियमात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे प्रकल्प ग्रस्तांना सहज दाखले उपलब्ध होत असल्याने याचाही लाभ घ्यावा, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी बैठकीत सांगितले.

महिंद प्रकल्पांतर्गत बोर्गेवाडीचे पुनर्वसन पाटण तालुक्यातील मौजे चांगुलेवाडी व सांगवड येथे करण्यात आले आहे. शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना दोन एकर जमिन व 370 चौरस फुटाचा भूखंड उपलब्ध करुन द्यावा,अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

महिंद प्रकल्पांतील प्रकल्प ग्रस्तांच्या विविध सुविधांचा आढावा घेतला. या पुनर्वसित नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची विहिर व रस्ता तयार करण्यात आला होता. त्या जागेची मोजणी करुन हद्द निश्चित कराव्यात. ज्या प्रकल्प ग्रस्तांना जमिनी मिळाल्या नाहीत त्यांना गणेशोत्सावानंतर जमिनी दाखविण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा. तसेच उदानिर्वाह भत्याचा प्रस्तावही सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

0000

संबंधित पोस्ट

विधानपरिषद अर्धा तास चर्चा-महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसिंचन क्षमता वाढविली जाईल- मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न*’रामराज्या’च्या संकल्पपूर्तीसाठी प्रभादेवी येथे हजारो भाविकांची उपस्थिती*भारतासह अमेरिका, कॅनडा, जपान, जर्मनी, आदी ४० देशांतील हजारो भाविकांनी घेतला ऑनलाईन लाभ!*

vishwatmaklokswamivarta

किल्ले प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचा पूर्णाकृती पुतळा व भव्य स्मारक उभारण्यास मंजुरी*  *सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पर्यटन मंत्री शंभुराजे देसाई यांच्या संयुक्त बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय.स्मारकासाठी निधी उपलब्ध करून प्रस्ताव तातडीने अंतिम करण्याच्या सूचना.* 

एमसीईडीत नवउद्योजकांसाठी क्षमता बांधणी कार्यशाळा”विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर”

शासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी कर्मचाऱ्यांचीत्रैमासिक सांख्यिकी (ER 1) माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेचे 366.80 कोटींचे विक्रमी करसंकलन ! कर संकलनात योगदान देणाऱ्या करदात्यांचे महापालिकेकडून आभार; 1 जुलैपासून विलंब दंड लागू!