vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गुणवत्तापूर्ण कामे करण्याला प्राधान्य द्यावे – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

गुणवत्तापूर्ण कामे करण्याला प्राधान्य द्यावे – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

 

राज्य प्रतिनिधी-सिंधुदुर्गनगरी,) सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही तडजोड न करता कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा. कंत्राटदारांकडून योग्यप्रकारे कामे करून घेतली जावीत. मान्सूनपूर्व उपाय योजनांवर अधिक भर देत दुरूस्तीची कामे लवकरात लवकर संपवावी. पावसाळ्याच्या अनुषंगाने सर्व यंत्रणा तयार ठेवण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.

सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृह येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार निलेश राणे, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, प्रभाकर सावंत तसेच सार्वजनिक बांधकाम विभागांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत करण्यात येत असलेल्या सर्व कामांमध्ये दर्जा राखण्यावर संबंधित यंत्रणांनी कटाक्षाने लक्ष द्यावे असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. मंत्री भोसले म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचा 100 दिवसांचा सात कलमी कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रभावीपणे काम करुन राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. आता 150 दिवसांच्या कालावधीत गुणवत्तापूर्ण कामे करुन प्रथम क्रमांक पटकावयाचा असल्याने सर्वांनी त्यादिशेने काम करावे. कामांच्या गुणवत्तेबाबत कुठलीही तडजोड होऊ नये याची दक्षता घ्यावी. कामांच्या ठिकाणी झाडे लावण्याचा आणि त्यांचे संगोपन करण्यात यावे असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

आमदार निलेश राणे यांनी जिल्ह्यातील रस्त्यांची आणि पुलांची दुरूस्ती करण्याची मागणी केली असता सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ती मागणी मान्य करुन तात्काळ रस्त्यांची दुरूस्ती करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागांच्या विविध कामांचा, प्रगतीपथावर असलेल्या उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराजांना शिवतीर्थावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन*

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राला २०४७ पर्यंत जागतिक दर्जाचे कौशल्य केंद्र बनवणार- कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा’विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाची कार्यशाळाकार्यशाळेत ६० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा सहभाग…

वारणा धरणात 22.49 टी.एम.सी. पाणीसाठा

ग्रामसभांच्या सक्षमीकरणातून प्रत्येक गावाचा शाश्वत विकास साधा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा**‘विकसित भारत–रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण)’ व पेसा कायद्यावर एक दिवसीय कार्यशाळा व पंच संमेलन**शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासह अत्याधुनिक सुविधा देण्यास कटिबद्ध – मंत्री प्रकाश आबिटकर

तृतीयपंथीयांच्या हक्क व कल्याण योजनांबाबत मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न