vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

कृषी समृद्धी योजनेसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावे-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे

कृषी समृद्धी योजनेसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावे-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे

ठाणे, प्रतिनिधी:- कृषी समृद्धी योजनेतंर्गत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2025-26 अंतर्गत विविध घटकांसाठी लाभ दिला जात आहे. महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी केले आहे.

कृषी समृद्धी योजनेतंर्गत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2025-26 मध्ये राबविण्यात येत असून यामध्ये क्षेत्र विस्तार, सामूहिक शेततळे, संरक्षित शेती, फलोत्पादन यांत्रिकीकरण, मधुमक्षिका पालन व काढणीत्तोर व्यवस्थापन इ. घटक राबविण्यात येत आहेत यामध्ये सुटी फुले व कंदवर्गीय फुलांची व बहुवार्षिक मसाला पिकांची लागवड (ड्रॅगन फुट, स्ट्रॉबेरी व ॲवकाडो) जुन्या व कमी उत्पादन देणाऱ्या आंबा बागांचे पुनरुज्जीवन, अळंबी उत्त्पादन प्रकल्प, हरितगृह, शेडनेट, प्लास्टिक आच्छादन, फळ पिकाकरिता फळांना, फळांच्या घडांना कव्हर, तण नियंत्रणक, आच्छादन सामूहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण फलोत्पादन, फलोत्पादन यांत्रिकीकरण घटकांतर्गत ट्रॅक्टर, पावर टिलर, फवारणी पंप. मधुमक्षिका पालन व मधकाढणी यंत्र फार्म गेट पॅक हाऊस शीतखोली, शीतगृह, शीतवाहन, प्राथमिक प्रक्रिया केंद्र फळ पिकवणी कक्ष व फिरते विक्री केंद्र इ. बाबींचा समावेश असून त्याकरिता 35 ते 50 टक्क्यांपर्यंत अनुदान देय आहे. वरील घटकांसाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in वर फलोत्पादन योजनेत सहभागी होण्यासाठी mahadbt.maharashtra.gov.in/farmer/agrilogin या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत.

योजनेच्या अधिक माहितीसाठी, कृषी विभागाच्या http://krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर किंवा नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. या योजनेच्या लाभासाठी अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी, 7/12 उतारा, 8-अ, आधार कार्डची छायांकित प्रत, आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत, जात प्रमाणपत्र (अनु.जाती, अनु जमाती शेतकऱ्यांनी) विहीत नमुन्यातील हमीपत्र, बंधपत्र, चतुः सीमा नकाशा, ही कागदपत्रे आवश्यक असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी कळविले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हा वार्षिक योजना सन 2026 -2027 साठी 547.97 कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता विकासकामांना गती, निधीचा प्रभावी वापर आणि वेळेत अंमलबजावणीवर भर

गावातील शेतरस्ते, शिवार रस्ते, पाणंद रस्ते खुले होणार – आजपासून ३१ मार्चपर्यंत जिल्हा महसूल प्रशासनाचा कालबद्ध कार्यक्रम 

vishwatmaklokswamivarta

३६५ दिवसात १२०० पेक्षा जास्त सांस्कृतिक कार्यक्रम – मंत्री ॲड.आशिष शेलार आशा भोसले व सुधीर फडके यांच्या बहारदार गीतांची ‘दीप उत्सव दिवाळी पहाट’

vishwatmaklokswamivarta

शहरात राहणाऱ्या अनुसूचित जाती, नवबौद्धांना  घरकुलासाठी मिळणार ₹२.५० लाख- जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटीलØ सर्व नगरपरिषद क्षेत्रात रमाई आवास योजना सूरुØ गरजुंनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आव्हान

खानापूर तालुक्यात अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या पदभरतीसाठी 4 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

होय, जैन समाजाच्या मनाप्रमाणेच निर्णय; धन्यवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta