vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कलोते-विनेगाव व तासगाव आदिवाडी येथेजिल्हाधिकारी श्री.जावळे यांच्याहस्ते आदि कर्मयोगी अभियानाचा शुभारंभ..

कलोते-विनेगाव व तासगाव आदिवाडी येथेजिल्हाधिकारी श्री.जावळे यांच्याहस्ते आदि कर्मयोगी अभियानाचा शुभारंभ..

रायगड( प्रतिनिधी:आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावून त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी केंद्र सरकारने ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत आदी कर्मयोगी उत्तरदायी शासन हा राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रम सुरू केला आहे. रायगड जिल्ह्यातील 14 तालुक्यांमधील 113 गावांमध्ये हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविला जाणार आहे. यामुळे जिल्ह्यात आदी कर्मयोगी उत्तरदायी शासन कार्यक्रमाला सुरुवात झाली असून रायगड जिल्ह्यातील आदिवासी पाड्यात आज विकासाची नवी पहाट उगवली आहे. या आदि कर्मयोगी अभियानाचा शुभारंभ (दि.17 सप्टेंबर रोजी) खालापूर तालुक्यातील कलोते-विनेगाव कातळाची वाडी तसेच माणगाव तालुक्यातील तासगाव आदिवासी वाडी येथे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते संपन्न झाला.

या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे, उपविभागीय अधिकारी माणगाव संदीपान सानप, सानप, तहसीलदार श्री.काळे, गटविकास अधिकारी श्रीम. शुभदा पाटील, खालापुर तालुक्याचे तहसीलदार. अभय चव्हाण, निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी तसेच ब्लॉक मास्टर ट्रेनर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले की, आदि कर्मयोगी अभियान, महसूल विभागाचे राजस्व अभियान व ग्रामविकास विभागाचे मुख्यमंत्री पंचायतराज अभियान यांचा उद्देश तळागाळातील आदिवासी बांधवांना सशक्त करणे व गावांचा सर्वांगीण विकास साधणे त्याचप्रमाणे शासनाच्या सर्व योजनांचा लाभ पोहोचवणे हा आहे.” गावकऱ्यांनी विकासाच्या प्रवासात सक्रिय सहभाग नोंदवावा,असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले. या कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी श्री.जावळे यांच्याहस्ते धरती आबा योजनेंतर्गत दाखल्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद झळकत होता. आदिवासी समाजाला विकासाच्या प्रवाहात सामील करून घेणाऱ्या या अभियानामुळे गावात आशा व आत्मविश्वासाची नवी ऊर्जा निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांनी केले. तर सहायक प्रकल्प अधिकारी श्रीम. तेजस्विनी गलांडे यांनी गाव विकास आराखडा तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले.

०००००००

संबंधित पोस्ट

स्वाधार’ योजनेतील त्रृटी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ

सौर ऊर्जा प्रकल्प वेळेत पूर्ण करा- अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे

जनगणना 2027 मधील हाऊस लिस्टिंग विषयक तीन दिवसीय प्रशिक्षण शिबीरास उत्साहात प्रारंभ*

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाचे दोन महत्त्वाचे निर्णय,सिंचन विहिरी दुरुस्तीसाठी मदत, नापीक जमिनी मनरेगातून लागवडीयोग्य करता येणार विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचे तातडीने अंमलबजावणीचे निर्देश..

vishwatmaklokswamivarta

उच्चशिक्षण घेणाऱ्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणे व त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी राज्यातील सर्व वसतिगृहासाठी १२०० कोटी उपलब्ध करुन देण्यात आल्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री- संजय शिरसाट 

vishwatmaklokswamivarta

पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसायाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी संशोधकांचे योगदान व नवतंत्रज्ञानाचा अधिक वापर महत्त्वाचा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

vishwatmaklokswamivarta