vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जामखेड तालुक्यातील श्री क्षेत्र #चौंडी येथे ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६’ या जलजागृती यात्रेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विधानपरिषद सभापती सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

जामखेड तालुक्यातील श्री क्षेत्र #चौंडी येथे ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६’ या जलजागृती यात्रेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विधानपरिषद सभापती सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

राज्य प्रतिनिधी-जामखेड तालुक्यातील श्री क्षेत्र #चौंडी येथे ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६’ या जलजागृती यात्रेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विधानपरिषद सभापती सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

 

श्री क्षेत्र चौंडी ही मराठी संस्कृतीचे माहेरघर असून गेल्या ३०० वर्षांपासून ही भूमी राज्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. ‘गोदा ते नर्मदा’ यात्रेचा प्रवास केवळ भौगोलिक नसून तो आध्यात्मिक व सांस्कृतिक आहे. आपल्या इतिहासाचा, संस्कृतीचा व लोकभावनेचा सन्मान करत ही यात्रा राज्यातच नव्हे तर देशभर जलसंवर्धनाचा नवा संदेश देईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. पाण्याचे महत्त्व पटवून देत #पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याचे कार्य या यात्रेतून होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

पुण्यश्लोक #अहिल्यादेवीहोळकर यांच्या कार्यातून जलसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित होते. ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६’ ही त्यांच्या कार्याला उजाळा देणारी असून या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडविण्याचा संकल्प आहे. जन्मभूमी ते कर्मभूमी या संकल्पनेतून चौंडी येथून निघालेली ही यात्रा जनतेमध्ये जलसंवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करेल, असा विश्वास सभापती प्रा. राम शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी खासदार रामराव वडकुते, आमदार काशिनाथ दाते, आमदार विठ्ठल लंघे, आमदार अमोल खताळ, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.00000

संबंधित पोस्ट

लातूर ग्रामीण भागातील मंडप, पेंडॉल तपासणीसाठी पथके गठीत*

हिंगोली जिल्ह्याच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते २७१ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गाव पातळीवर जाऊन पक्ष संघटन मजबूत करा – संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पक्षांतर होत असतांना शिवसेना बांधतेयनिष्ठावंतांची मोट – जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक,दिनाचा दिमाखदार सोहळा**वैदिक मंत्रोच्चार, पालखी सोहळा, राजसदरावरील अभिषेक आणि शिवभक्तांच्या उत्स्फूर्त सहभागाने रायगड शिवमय…

जालना येथे महावितरण कंपनीकडून रोजच लाईट पाच पाच मिनिटाला जात असून त्यासाठी बाबासाहेब वानखेडे कुलस्वामी यांनी नायब तहसीलदार तायडे यांना निवेदन 

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्न