vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दिव्यांगांचे जीवन सुकर करण्यास सर्वोच्च प्राधान्य-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

दिव्यांगांचे जीवन सुकर करण्यास सर्वोच्च प्राधान्य-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी दिव्यांगांचे जीवन सुकर व्हावे यासाठी अनेक योजना आहेत. तसेच त्यासाठी निधीही राखीव आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या राखीव निधीतून दिव्यांगांसाठीच्या योजना राबवून त्यांचे जीवन सुकर करण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.

 जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र जिल्हा व्यवस्थापन संघाची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन संगीता राठोड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी साहेबराव चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुहास हरबडे, डॉ प्रसाद कुलकर्णी, डॉ. महेश लड्डा यांच्यासह लखीचंद चव्हाण, महेश गोसावी, पुणे येथील दिव्यांग सर्वेक्षण संस्थाचे संचालक उपस्थित होते.

     जिल्हाधिकारी स्वामी यांनी निर्देश दिले की,दिव्यांगांसाठी शासनाने राखीव ठेवलेला निधी दिव्यांगांना विविध साधने उपलब्ध करून त्यांचे जीवन सुकर करण्यासाठी करावा. प्राधान्याने त्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यात सर्व शासकीय विभागाने प्रयत्न करावे. वेळेत निधी खर्च करून लाभार्थ्यांना लाभ द्यावा. दिव्यांगांचे सर्वेक्षण, त्याची वर्गवारी व त्यांच्या आवश्यक असलेल्या साधनांची सूची तयार करण्यात यावी. यावेळी शासकीय कार्यालयात असणाऱ्या दिव्यांगांसाठीच्या सुविधांबाबत जिल्हाधिकारी स्वामी यांनी आढावा घेतला.०००००

संबंधित पोस्ट

पैसे नाही म्हणून शस्त्रक्रिया थांबणार नाही-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गंभीर आजारांवरील उपचारांसाठी निधी हजारो रुग्णांनी घेतला ‘महाआरोग्य शिबिरा’चा लाभ

पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘जॉय मिनी ट्रेन’ सुरू करणार- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

सामाजिक न्याय विभागाचा आज राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा-सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

vishwatmaklokswamivarta

ओबीसींच्या सर्वसमावेशक विकासावर शासनाचा भर – इतर मागास बहुजन विकास मंत्री अतुल सावे • रोजगार मिळविण्यापेक्षा रोजगार देणारे व्हा• नांदेडमध्ये ‘कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळावा’ उत्साहात ..

vishwatmaklokswamivarta

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सांगली जिल्हा दौरा

vishwatmaklokswamivarta

राज्यातील काही जिल्हयांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असल्यामुळे राज्याच्या महत्वाच्या ठिकाणी एनडीआरएफच्या सतरा आणि एसडीआरएफच्या सहा पथकं सज्ज..

vishwatmaklokswamivarta