vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

सामाजिक न्याय विभागाचा आज राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा-सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

सामाजिक न्याय विभागाचा आज राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा-सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

             मुंबई, प्रतिनिधी: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन २०२३-२४ या वर्षासाठी राज्यभरातून एकूण १३० सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे वितरण १० जून २०२५ रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे यशस्वी आयोजन होण्यासाठी सर्व यंत्रणांनी नियोजनाप्रमाणे काम करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सामाजिक न्याय विभागाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याच्या नियोजनाचा आढावा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे घेतला. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

    मंत्री श्री. शिरसाट म्हणाले, हा पुरस्कार वितरण सोहळा प्रेरणादायी ठरावा यासाठी प्रत्येक बाबीकडे बारकाईने लक्ष द्यावे. कामाच्या नियोजनाप्रमाणे आराखड्याची अंमलबजावणी करावी व दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. मंत्री संजय शिरसाट यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बैठक व्यवस्था, स्वच्छता, वाहनतळ व्यवस्था, आरोग्य व्यवस्था आदींचा आढावा यावेळी घेतला.

****

संबंधित पोस्ट

स्वतः चे घर स्वतः चे ताब्यात “या मोहिमे अंतर्गत२५ हजार घरांचे बांधकाम १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करा- विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचे निर्देश.. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडून जिल्हा परिषदेकडील योजनांचा आढावा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांचे प्रकल्प संचालक यांची उपस्थिती

ठाणे शहरात ३ बेकायदेशीर हुक्का पार्लरवर कारवाई

शेतकऱ्यांनी 30 जूनपूर्वी पीक कर्ज नूतनीकरण करून घ्यावे – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

जालना महापालिके मार्फत 50000 वृक्ष लागवड कार्यक्रमाचे जागतिक पर्यावरण दिनी मा.आमदार अर्जुन खोतकर यांचे हस्ते वृक्ष रोपण करून सुरुवात… 

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सिक्कीम चे राज्यपाल ओम माथुर यांची भेट*

जन धन खातेधारकांसाठी ई-केवायसी’ आणि जनसुरक्षा योजनांचीअंमलबजावणीसाठी बँक आपल्या गावात..