vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जादा भाडे आकारणाऱ्या  खासगी कंत्राटी प्रवासी बस व रिक्षा यांचे विरुध्द तक्रार करा..

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जादा भाडे आकारणाऱ्या  खासगी कंत्राटी प्रवासी बस व रिक्षा यांचे विरुध्द तक्रार करा..

रायगड प्रतिनिधी:- आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जादा भाडे आकारणाऱ्या खासगी कंत्राटी प्रवासी बस व रिक्षा यांचे विरुध्द वाहन क्रमांक व प्रवासाच्या तपशीलासह उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ई-मेल आयडी rto.४६-mh@mah.gov.in अथवा 900467014 या कार्यालयाच्या व्हॉटसअप क्रमांकावर तक्रार दाखल करावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल हरिभाऊ जेजूरकर यांनी केले आहे.

 राज्यात आगामी सुरू होणाऱ्या गणेशोत्सव सणाच्या अनुषंगाने सर्व खाजगी बस वाहतुकदारांनी शासनाने निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा जास्त भाडे आकारू नये. तसेच क्षमतेपेक्षा जादा प्रवाशांची वाहतूक करू नये. शासनाच्या नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या वाहतुकदारांवर कडक कारवाई करण्यात येईल. तसेच प्रवाशांनी असे जादाचे भाडे आकारणाऱ्या बस मालकांविरुध्द पुरावानिशी लेखी स्वरूपात छायाचित्रासह तक्रार दाखल करावी.

जिल्हयातील प्रवाशी रिक्षांच्या मनमानी भाडे आकारणी बाबत प्रादेशिक परिवहन प्राधिकरणातर्फे तयार करण्यात आलेला भाडेदर तक्ता (मीटरप्रमाणे व शेअर रिक्षा) हा जिल्हयातील विविध रिक्षा थांब्यावर प्रदर्शित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे त्या त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे भाडेदर विचारात घेवून खाजगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति कि. मी. भाडेदराच्या 50 टक्के पेक्षा अधिक राहणार नाही असे कमाल भाडेदर 27 एप्रिल 2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित केले आहेत.

000000

संबंधित पोस्ट

अनधिकृत बालगृहावर महिला व बाल विकास विभागाची कारवाई; ९१ बालकांची सुटका

vishwatmaklokswamivarta

शिराळा नगरपंचायत प्रभाग क्र. 4 मतदानासाठी संबंधित शाळांना सुट्टी जाहीर

vishwatmaklokswamivarta

आज तब्बल ५ हजार ३५४ घरे व ७७ भूखंडाच्या संगणकीय सोडतीद्वारे घराचे स्वप्न झाले साकार-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते म्हाडा कोकण मंडळ सोडत–२०२५ संपन्न

vishwatmaklokswamivarta

माणगांव येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” उत्साहात  संपन्न२,७४८ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ, अनाथ लाभार्थ्यांत पोलीस शिपाई पदीनिवड झालेल्या युवकाचा विशेष सन्मान !

vishwatmaklokswamivarta

धरण परिसरात पर्यटन विकासाला प्राधान्य – जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिव पुरस्कार, नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार व क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कारासाठी प्रस्ताव करण्यास मुदतवाढ