vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

धरण परिसरात पर्यटन विकासाला प्राधान्य – जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

धरण परिसरात पर्यटन विकासाला प्राधान्य – जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी, प्रतिनिधी पर्यटनाला चालना देण्यासाठी जलसंपदा विभागाने धरण परिसराच्या विकासाला प्राधान्य दिले असून, या संदर्भातील काम सुरू झाले आहे. जायकवाडी, माजलगाव, इसापूर या धरणांसह अहिल्यानगर जिल्ह्यातील निळवंडे व भंडारदरा परिसरात पर्यटन केंद्रे विकसित करून रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डॉ. विखे पाटील यांनी स्वागत केले. यावेळी पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे व माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे उपस्थित होते. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी धरण पर्यटनासंदर्भातील धोरणाची माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने धरण परिसरातील जलसंपदा विभागाच्या जागांचा उपयोग पर्यटन विकास केंद्रांसाठी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासाठी एक निश्चित धोरण तयार करण्यात आले असून, बहुराष्ट्रीय कंपन्या याकामी सल्लागार म्हणून काम पाहणार आहेत. गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या माध्यमातून पर्यटन विकासाचे काम सुरू करण्यात आले आहे.

महामंडळासाठी आर्थिक स्रोत निर्माण व्हावेत तसेच स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध व्हावा, हा यामागील मुख्य उद्देश आहे. नवीन धोरणानुसार वॉटर स्पोर्ट्स व रिसॉर्ट्स उभारून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सुयोग्य नियोजन करण्यात आल्याचेही जलसंपदामंत्र्यांनी स्पष्ट केले.

00000

संबंधित पोस्ट

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी संधी 

वारणा धरणात 25.31 टी.एम.सी. पाणीसाठा

रस्ता दुभाजक तोडणाऱ्यांवर पोलीस;परिवहन आणिसाबांविने संयुक्त कारवाई करावी- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांचा दौरा 

शासकीय योजनांच्या लाभासाठी समन्वय यंत्रणा म्हणून पालकमंत्री कार्यालय हेल्पलाईन उपयुक्त ठरेल      – पालकमंत्री चंद्रकांत पाटील- पालकमंत्री कार्यालय हेल्पलाईनचे उद्‌घाटन- सेवा, सुशासन, गरीब कल्याणाचे उद्दिष्ट गतिशील करण्याचा हेतू- हेल्पलाईन संपर्क क्रमांक 8808806088064

हिंद दी चादर शहीदी समागम कार्यक्रमासाठी विविध २० ठिकाणांहून मोफत बससेवा-भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta