vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यातील सैनिकी शाळांच्या शैक्षणिक सुधारणांसाठी राज्यस्तरीय समिती गठीत करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह्याद्री अतिथीगृह येथे सैनिकी शाळांच्या धोरणात सुधारणा करण्याबाबत आढावा बैठक

राज्यातील सैनिकी शाळांच्या शैक्षणिक सुधारणांसाठी राज्यस्तरीय समिती गठीत करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,सह्याद्री अतिथीगृह येथे सैनिकी शाळांच्या धोरणात सुधारणा करण्याबाबत आढावा बैठक

 

राज्य प्रतिनिधी मुंबई,  राज्यातील जास्तीत-जास्त विद्यार्थी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) मध्ये सहभागी व्हावेत आणि शिस्तप्रिय,आत्मविश्वास असलेला, सांघिकवृत्ती जोपासणारा, नेतृत्वाभिमुख विद्यार्थी तयार करण्याच्या दृष्टीकोनातून सैनिकी शाळांचे धोरण जाहीर केले आहे. यामध्ये सुधारणा करण्याची मागणी शाळांकडून होत असून या मागण्यांच्या अनुषंगाने आणि शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासाठी राज्यस्तरीय समिती गठीत करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सैनिकी शाळांच्या धोरणात सुधारणा करण्याबाबत आढावा बैठक झाली. या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावर, माजी मंत्री राजेश टोपे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या समितीने सैनिकी शाळातील शैक्षणिक सुधारणा, गुणवत्ता, प्रवेशप्रक्रिया, सीबीएसई अभ्यासक्रम आणि शाळेच्या विविध मागण्यासंदर्भात अभ्यास करून एक महिन्यात राज्य शासनाकडे अहवाल सादर करावा. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थी हिताचा धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

संबंधित पोस्ट

स्टार्टअप्स, बचत गटांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील-उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते महाराष्ट्र दालनाचे थाटात उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवारी (दि.२१)बिबी का मकबरा व विभागीय क्रीडा संकूलात सामुहिक योगासने

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बुधवारी (दि.११) पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

vishwatmaklokswamivarta

राज्यपालांकडून कर्मवीर भाऊराव पाटील सातारा विद्यापीठाचा आढावा

विधानसभा लक्षवेधी सूचना :शहरातील शाळा इमारतींच्या फायर ऑडिट संदर्भात आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना– नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

३८ वर्षांनंतर कृषी विभागाला मिळाले नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य नव्या बोधचिन्ह आणि घोषवाक्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण,”हा लोगो म्हणजे नव्या युगातील नव्या कृषी विचारांचा आरंभ आहे.” – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

vishwatmaklokswamivarta