vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

माजी सैनिक पत्नी, माजी सैनिक विधवा पत्नी यांची बचतगट क्लस्टर योजना

माजी सैनिक पत्नी, माजी सैनिक विधवा पत्नी यांची बचतगट क्लस्टर योजना

 

रायगड, प्रतिनिधी : सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट़ राज्य, पुणे यांच्यातर्फे माजी सैनिक पत्नी/विधवा यांचा 11 च्या समूहाने बचत गट निर्माण करुन बँकेकडून कर्ज घेऊन स्वयंरोजगार सुरु केल्यास अशा बचत गटांना सैनिक कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग यांचेकडून कल्याणकारी निधीमधून जास्तीत जास्त 15 लाख रुपयांपर्यंत अनुदान /अर्थ सहायय देण्याची योजना सुरु आहे. प्रकल्प व्यवस्थित सुरु असलेल्या बचतगटांनी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

जिल्हयातील सर्व माजी सैनिक पत्नी / विधवा पत्नी यांना बचत गट स्थापनेसाठी तसेच बचत गटांसाठी विविध स्वयंरोजगार योजनांची माहिती देणे प्रस्तावित आहे. जिल्हयामध्ये अगोदरच बचत गट स्थापन झालेले असल्यास तसेच नविन बचत गट स्थापन करणे करीता माजी सैनिक पत्नी / विधवा पत्नी इच्छूक असल्यास जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग येथे संपर्क साधावा. नावे नोंदणीसाठी आणि

संपर्कासाठी-1.श्री विष्णू काशिराम गायकवाड, कल्याण संघटक मो. नं. 8097127348, 2. श्री अभिजित दशरथ शिंदे, कल्याण संघटक मो. नं. 7391988899,3. श्री विजय रमेश पाटिल, कल्याण संघटक, मो. नं. 8985367005

तरी जिल्हयातील माजी सैनिक पत्नी /विधवा पत्नी यांनी महिला बचत गट योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा तसेच जिल्यामधील माजी सैनिक संघटना यांचेकडून ज्या महिला सदर योजनेसाठी पात्र आहेत व बचत गटाचे सदस्य झालेले नाहीत अशा माजी सैनिक पत्नींना बचत गट निर्माण करण्यासाठी प्रोत्साहीत करावे असे आवाहन ले.कर्नल राहुल वैजनाथ माने (नि.) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड यांनी केले आहे.०००

संबंधित पोस्ट

फलटण व कोरेगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस रिक्त पदांची भरती

vishwatmaklokswamivarta

मुळशी–मावळ टप्प्यात ल्यूक मडग्वेचे वर्चस्व; हर्षवीर सिंग सर्वोत्तम भारतीय सायकलपटू बजाज पुणे ग्रँड टूर २०२६

vishwatmaklokswamivarta

राज्य लॉटरीच्या जानेवारी महिन्यातील भव्यतम, मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर

vishwatmaklokswamivarta

समाधान समारोह 2026 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयातील विशेष लोकअदालत 21, 22 व 23 ऑगस्टला- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अदिती उदय कदम- सहभागासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 मे 2026

शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेचे प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव• मॉडेल डिग्री कॉलेजच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन…