vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील सेवेचा लाभ घेण्यासाठीमाजी सैनिकांनी ऑनलाईन नोंदणी करावी..

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील सेवेचा लाभ घेण्यासाठीमाजी सैनिकांनी ऑनलाईन नोंदणी करावी..

 रायगड, प्रतिनिधी:सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यातर्फे सर्व डाटा डिजीटलायझेशन/संगणकीकरण करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील कोणत्याही सेवेचा लाभ घेण्यासाठी, माजी सैनिकांनी www.ksb.gov.in व https://mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग (निवृत) ले.कर्नल राहुल वैजनाथ माने यांनी केले आहे.

 रायगड जिल्ह्यातील सेवा निवृत अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, युध्द विधवा,वीर पत्नी,वीर माता/वीर पिता यांनी www.ksb.gov.in व https://mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि.31 मार्च 2025 पूर्वी नोंदणी करावी. कार्यालयातील कोणत्याही अर्जावर कारवाई करण्यासाठी तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. तुम्हाला सध्या/आता कोणत्याही सेवेची आवश्यकता नसली तरीही दोन्ही संकेतस्थळावर नोंदणी करणे गरजेचे आहे. या संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट़ेशन करण्यासाठी माजी सैनिकांना फी म्हणून रू.100/- लागणार आहेत. माजी सैनिक विधवा व अवलंबिताना फी माफ आहे. यासाठी या कार्यालयाद्वारे दिलेले ओळखपत्र असणे गरजेचे आहे.

रजिस्ट़ेशन करण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड,सैन्यसेवा पूस्तकाची छायांकित प्रत, माजी सैनिक ओळखपत्र,फोटो,ECHS Card,बँक पासबुक छायांकित प्रत ही कागरदपत्रे आवश्यक आहेत. माजी सैनिकांनी लवकरात लवकर फॉर्म भरून जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात जमा करावे. ०००००००

संबंधित पोस्ट

मुंबई पोलिसांचे कौतुकास्पद पाऊल, चोरीला गेलेली आणि हरवलेली ८९.७९ लाख रुपये नागरिकांना परत करण्यात आले

vishwatmaklokswamivarta

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३१ मे २०२५ रोजी ३०० वी जयंती आहे. याच निमित्ताने त्यांचे कार्य आणि विचारावर आधारित विशेष लेख !

मुंबई सह उपनगरात आणि राज्यभरात रात्रभर मुसळधार पावसाची हजेरी

सुट्टे खाद्यतेल व्यावसायिकांना कायद्यानुरूप बदलांसाठी एक वर्षाची मुदत — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एफडीए आणि व्यापाऱ्यांची संयुक्त समिती स्थापन करणार

vishwatmaklokswamivarta

सायबर सुरक्षा नियंत्रण प्रणालीत महाराष्ट्राचा पुढाकार- मंत्री ॲड.आशिष शेलार ‘रिंग द बेल फॉर सिक्युरिटी’ मोहिमेचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

ऑनलाईन मालमत्ता करभरणा प्रणालीला उत्साही प्रतिसाद देत करदात्या नागरिकांमध्ये 15 टक्के वाढ लवकरच अद्ययावत ‘भारत बिल पेमेंट सिस्टम’चाही कर भरण्यासाठी होतोय समावेश..