vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशराजकारण

राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी मोठी गर्दी केल्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह उफाळून आला.*महापालिकेत आमच्या शिवाय महापौर होणार नाही ~अरविंद चव्हाण 

राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी मोठी गर्दी केल्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह उफाळून आला.*महापालिकेत आमच्या शिवाय महापौर होणार नाही ~अरविंद चव्हाण

जालना: प्रतिनिधी /महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा गट) दोन अंकीचा आकडा पार केल्याशिवाय राहणार नाही, आणि आमच्या शिवाय कोणत्याही पक्षाला महापौर करता येणार नाही असा दावा जालना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माजी आ.अरविंदराव चव्हाण यांनी केला. रविवार रोजी इच्छुकांनी मोठी गर्दी केल्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह उफाळून आला.  जालना शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रविवार रोजी जिल्हा पक्ष कार्यालय येथे जालना महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी आणि इच्छूक उमेदवारांना पक्षाचे उमेदवारी अर्ज वितरण करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी श्री चव्हाण बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. ते पुढे बोलताना म्हणाले की, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे शिव,शाहू, फुले आंबेडकर यांच्या समतेच्या विचाराशी प्रेरित होऊन पक्ष संघटना उभी करत आहे. त्यांच्या या धर्मनिरपेक्ष विचारामुळे समाजातील सर्व समाज घटक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आहे.  आगामी महापालिकेच्या निवडणुकीत पक्षातील सर्व समाज घटकातील कार्यकर्त्यांना पक्षाची उमेदवारी देऊन न्याय देण्याचे आश्वासन श्री. चव्हाण यांनी यावेळी दिले. जालना शहराचा सर्वांगीण विकास होऊन शहर स्वच्छ व सुंदर व्हावे यासाठी आमचा पक्ष कटिबद्ध राहील असे श्री चव्हाण यांनी सांगितले.   पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कार्यकर्ते अग्रेसर ~ शेख मेहमूद  जालना शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून आपल्या नियुक्तीला अल्प काळ झालेला असताना शहरातील धर्मनिरपेक्ष विचारांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आपण पक्ष बांधणीला सुरवात केली असून, लवकरच शहर जिल्हा कार्यकारणी व बूथ कमिट्या व तसेच प्रभाग समित्याचे गठण करण्यात येणार आहे,असे शेख मेहमूद यांनी आपल्या भाषणातून सांगितले. काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर बरेचशे पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मध्ये समाविष्ट झालेले आहे, त्यांना देखील पक्षामध्ये योग्य सन्मान दिला जाईल असे शेख मेहमूद यांनी यावेळी सांगितले. महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाकडे मजबूत फळी अस्तित्वात येत असल्याने निवडणुकीत मोठे यश मिळाल्या शिवाय राहणार नाही असा विश्वास शेख मेहमूद यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी राष्ट्रवादी प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस धैर्यशील चव्हाण, महिला प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या शकुंतलाताई कदम, जिल्हा अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष शहाआलम खान, प्रदेश पदाधिकारी भाऊसाहेब गोरे ,मिर्झा अन्वर बेग ,अण्णासाहेब चितेकर, प्रभाकर घेवंदे, आदी पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून उपस्थित कार्यकर्त्यांना पक्ष बळकट करण्याचे आवाहान केले. या प्रसंगी फिरोज सौदागर पद्माकर हंडे, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या रिंकल तायड ,विजय सोनवणे, शिवराज जाधव, सतीश वाहुळे, ॲड शेखर पाटील शीतलताई बरोटे,इमरान बिल्डर, अजीम बागवान, जहीर बिल्डर, ॲड दीपक नाईक,जावेद अली, शेख मुज्जमिल, सय्यद आरीफ, समीर खैराती, शेख मोसिन शेख समी, शेख युनाफ सोहेल खान , न्यानेश्वर शिरसागर, सौ. सुजाता डांगे, डॉ. रामकृष्ण भोंडा ओमकार उबाळे,राहुल राठोड, जावेद देशमुख, गणेश नौपुते, नरेश रायपल्ली, निर्मला बाई सले, संतोष निकाळजे, राजेश म्हस्के, राजश्री रोकडे, संध्या असलवे, छाया बोर्डे, भारती पाडमुख, लता तोडकर, पुष्पा राऊत, मंदा ढोकळे, राणी शिंदे, जिगर तुपसुंदर, शेख रईस, सालम चाऊस, जबीर शेख, शेख शफीक, सह आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिर्झा अन्वर बेग यांनी केले तर उपस्थितांचे आभार शितल ताई बरोटे यांनी मानले, यावेळी जिल्हा अध्यक्ष माजी.आ.अरविंद चव्हाण यांच्या हस्ते पक्षाचे उमेदवारी अर्ज उमदेवाराना देण्यात आले.

संबंधित पोस्ट

जी.डी.सी.अण्ड ए. व सी.एच.एम. परीक्षा २३, २४ व २५ मे रोजी*

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते गुजरातमधील आणंद इथे त्रिभुवन सहकारी विद्यापीठ या देशातील पहिल्या सहकारी विद्यापीठाचे भूमिपूजन

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार : पालकमंत्री अतुल सावे शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी

बीड जिल्ह्यातील १३६३ विकासकामांचे भूमिपूजन व पुरस्कार वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

ई-गव्हर्नन्सची अंमलबजावणी ; ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकाऱ्यांना लॅपटॅापचे वाटप..