vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

उष्णतेच्या लाटेबाबत जिल्हा प्रशासनाचा इशारा

उष्णतेच्या लाटेबाबत जिल्हा प्रशासनाचा इशारा

    अमरावती, प्रतिनिधी: जिल्ह्यात येत्या तीन दिवसात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्याच्या तापमानात वाढ होणार असून नागरिकांनी याबाबत सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

    भारतीय हवामान खात्याने विदर्भात येत्या तीन दिवस उष्णतेच्या लाटेबाबत इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारी उन्हात जाणे टाळावे, तसेच आवश्यक असल्यास उष्णतेपासून बचाव करण्याचा उपायाचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

उष्णतेच्या लाटेबाबत इशारा / Heat Wave Advisoryभारत हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांनी विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेची (Heat Wave) चेतावणी जारी केली आहे. तसेच विदर्भातील इतर भागांमध्येही कमाल तापमान सामान्यापेक्षा सुमारे ३–४°से. अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी.उष्णतेच्या लाटेदरम्यान घ्यावयाची काळजी (IMD मार्गदर्शक तत्त्वे):* शक्यतो दुपारी १२ ते ३ या वेळेत बाहेर जाणे टाळावे.* पुरेसे पाणी प्या, तहान नसली तरी नियमितपणे द्रवपदार्थ घ्यावेत.* हलके, सैल आणि फिकट रंगाचे सूती कपडे परिधान करावेत.* बाहेर पडताना टोपी, छत्री किंवा ओला कापड वापरून डोके झाकावे.* मद्यपान, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड पेये कमी प्रमाणात घ्यावीत, कारण त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता वाढू शकते.* लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी.* जनावरांना सावलीत ठेवावे व त्यांना पुरेसे स्वच्छ पाणी द्यावे.* उष्माघाताची लक्षणे (डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ, जास्त घाम येणे) जाणवली तर त्वरित सावलीत विश्रांती घ्यावी व आवश्यक असल्यास वैद्यकीय मदत घ्यावी.नागरिकांनी सतर्क राहून हवामान विभागाच्या पुढील सूचना व अद्ययावत माहितीकडे लक्ष द्यावे.भारत हवामान विभागप्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर

संबंधित पोस्ट

पालकमंत्री अजित पवारांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळेबीड येथे ‘सीट्रिपलआयटी’ उभारणीच्या कामाला गती बीडमधील ‘सीट्रिपलआयटी’साठी एमआयडीसीकडूनचार हजार चौरस मीटर जागा व निधी देण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार 

एसटीच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्यांना तिकीट दरात पंधरा टक्के सूट देण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा.

रामनगर येथे दीपावली व पाडवा स्नेह मिलन सोहळा उत्साहात संपन्न*

vishwatmaklokswamivarta

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न

मुंबईचे महापौर रितू तावडे यांना बॉम्बने उडवण्याची धमकीचा इमेल- पालिका मुख्यालयात सुरक्षेत मोठी वाढ …

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पदयात्रादेशाच्या एकात्मतेसाठी कटीबद्ध राहू या- इमाव कल्याण मंत्री अतुल सावे

vishwatmaklokswamivarta