vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

एटापल्लीचा मशरूम प्रकल्प जोमात; उत्पादनाला बाजारपेठेत उत्स्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद*“स्थानिक मशरूम खरेदी करून उपक्रमाला साथ द्या” – महिला बचत गटांचे आवाहन*

**एटापल्लीचा मशरूम प्रकल्प जोमात; उत्पादनाला बाजारपेठेत उत्स्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद*“स्थानिक मशरूम खरेदी करून उपक्रमाला साथ द्या” – महिला बचत गटांचे आवाहन*

गडचिरोली प्रतिनिधी एटापल्ली तालुक्यातील मशरूम उत्पादन प्रकल्पाबाबत “प्रकल्प बंद” असल्याच्या अफवांना पूर्णविराम देत, हा प्रकल्प नियोजनबद्ध आणि पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. उलट, पहिल्याच टप्प्यात यशस्वी उत्पादन घेत या प्रकल्पाने बाजारपेठेत ठोस ओळख निर्माण केली असून, पुढील उत्पादन टप्प्यासाठी सज्ज झाला आहे.

मशरूम उत्पादन ही अत्यंत संवेदनशील आणि वैज्ञानिक पद्धतीने केली जाणारी शेती असून, नियमित तांत्रिक प्रक्रियेनुसार पुढील बॅचसाठी तयारी सुरू आहे. उत्पादन कक्षांचे निर्जंतुकीकरण, नवीन सबस्ट्रेट व स्पॉनची तयारी तसेच तापमान व आर्द्रतेचे व्यवस्थापन यांसारख्या प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. त्यामुळे प्रकल्प बंद असल्याचे समजणे चुकीचे असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

या प्रकल्पामुळे एटापल्ली परिसरातील महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला असून, त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होत आहे. दुर्गम भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा हा प्रभावी नमुना ठरत आहे. स्थानिक स्तरावर उत्पादित मशरूमला बाजारपेठेत उत्स्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, ग्राहकांमध्ये त्याची मागणी वाढत आहे.

दरम्यान, मशरूम उत्पादक महिला बचत गटांनीही प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त केले आहे. महिला सरस्वती बचत गटाच्या सदस्यांनी सांगितले की,> “मशरूम विक्रीसाठी कोणतीही अडचण नसून आम्ही समाधानी आहोत.”संताजी महिला बचत गटाने नमूद केले की,> “गावात एकूण सहा मशरूम उत्पादक गट कार्यरत आहेत. आम्ही मशरूम उत्पादनाचे प्रशिक्षण घेतले असून उत्पादन सुरळीतपणे सुरू आहे.”तसेच इतर मशरूम उत्पादक बचत गटांच्या सदस्यांनी सांगितले की,> “मशरूम उत्पादन व्यवस्थित सुरू आहे. शासनाकडून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आमची कोणतीही तक्रार नाही.”

या पार्श्वभूमीवर महिला बचत गटांच्या सदस्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की,> “आमच्या एटापल्लीतील ताज्या व गुणवत्तापूर्ण मशरूमला ग्राहकांनी प्राधान्य द्यावे. स्थानिक उत्पादनाला साथ दिल्यास आमच्या उपजीविकेला मोठा आधार मिळेल.”

 नागरिकांनी या नाविन्यपूर्ण मशरूम उत्पादन उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी केले आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

माध्यमांनी समाजाचे वैचारिक नेतृत्व करावे- संचालक हेमराज बागुल

बारामती विधानसभा पोटनिवडणूक महायुतीच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या प्रचारार्थ ‘सांगता सभा’प्रचाराचा शेवटचा दिवस. 

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती दिनानिमित्त मंगळवार, १४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. #बाबासाहेबआंबेडकर यांच्या जीवनावर आधारित माहितीपटासह, चित्रपटाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विविध समाजमाध्यमांवरून तसेच दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारण करण्यात येणार

vishwatmaklokswamivarta

गर्भलिंग तपासणी प्रतिबंधक कायद्याची (PCPNDT) जनजागृती व्हावी यासाठी जिल्ह्यातील जनतेमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी गुरुवार दि.१४ ऑगस्ट रोजी ‘कन्या सन्मान दिवस’ साजरा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

शेतकऱ्यांच्या हक्काचे संरक्षण करण्यासोबतच कृषी क्षेत्राच्या बळकटीकरणाकरिता राज्य शासन कटिबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवार

सामाजिक समता सप्ताह निमित्तअंधश्रद्धा, जादूटोणा विषयी जनजागृती..