vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानस्थानिक बातम्या

मुंबईच्या ‘वेव्हज्’ परिषदेत नवकल्पनेसोबत तंत्रज्ञानाचा महासागर…

मुंबईच्या ‘वेव्हज्’ परिषदेत नवकल्पनेसोबत तंत्रज्ञानाचा महासागर…

 

मुंबई प्रतिनिधी- केंद्र सरकारच्यावतीने जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्राकरिता ‘वेव्हज् 2025 परिषद’ मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे होत आहे. या परिषदेचे यजमानपद महाराष्ट्र शासन भूषवत आहेत. दि. 1 ते 4 मे 2025 या कालावधीत होत असलेल्या या परिषदेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. मुंबईत होणाऱ्या या परिषदेस विविध देशांचे मंत्री, धोरणकर्ते, उद्योगपती तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

वेव्हज् परिषदेत जगभरातून 100 पेक्षा जास्त देश सहभागी होणार आहेत. या परिषदेच्या माध्यमातून भारतातील क्रिएटिव्ह इकॉनॉमीला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्यास मदत होणार आहे. भारतामध्ये माध्यम आणि मनोरंजन उद्योग वेगाने वाढत असून रोजगारनिर्मितीसाठी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत आहे. त्याचबरोबर ओटीटी, ॲनिमेशन, गेमिंग, व्हीएफएक्स, चित्रपट, संगीत आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात देश प्रगती करत आहे. या पार्श्वभूमीवर वेव्हज् परिषदेचे आयोजन होत असून या परिषदेत चर्चासत्रे, उद्योगक्षेत्रात गुंतवणूक आणि विविध कार्यक्रम होणार आहे.

या परिषदेच्या पहिल्या दिवशी ‘भारत व महाराष्ट्र पॅव्हिलियन’ आणि वेव्हज प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून काही महत्त्वपूर्ण घोषणा व सामंजस्य करार (MOU) करण्यात येणार आहे. त्याचबरोबर क्रिएटोस्पिअरचे उद्घाटन आणि ‘वेव्हज बझार’, वेव्हज एक्सलेटर इत्यादींचा प्रारंभ होणार आहे. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी जागतिक मीडिया संवाद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमध्ये संवाद तसेच क्रिएट इन इंडिया चॅलेन्जेसची अंतिम फेरी होणार आहे. या परिषदेच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी विविध चर्चासत्रांबरोबरच प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे.

संबंधित पोस्ट

हिंद-दी-चादर या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

शेतकऱ्यांची पाटी कोरी होणार, 7.5 एचपीपर्यंतच्या कृषी पंपधारकांचे ₹48,000 कोटींचे थकीत वीजबिल माफ करणार, शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक कर्जमुक्तीचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शेतकऱ्यांकडून मुंबईत सत्कार…

सुधीर मुनगंटीवार यांच्या मदतीमुळे सुरेखा शिंदे पुन्हा स्वत:च्या पायावर उभ्या झाल्याआ. मुनगंटीवार यांच्या संवेदनशील कृतीने मुलीच्या डोळ्यात आले पाणीआई पुन्हा चालू लागली… हे केवळ वैद्यकीय यश नाही, तर सुधीरभाऊंसारख्या संवेदनशील नेतृत्वामुळे शक्य

संजय गांधी निराधार योजना सांगली शहर बैठकीत 94 प्रकरणे पात्र…

vishwatmaklokswamivarta

हिंद दी चादर गुरु तेग बहादुर यांचा 350 वा शहीदी समागम-जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर· उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय· मंत्री व अधिकाऱ्यांचे विदेश दौरे रद्द· अत्यावश्यक सोडून विशेष विमान, हेलिकॉप्टर दौरे नको· बहुतेक बैठका व्हीसीद्वारे करण्याचे निर्देश· मंत्री व अधिकाऱ्यांनी किमान एक दिवस सार्वजनिक वाहतूक वापरण्याचे निर्देश..