vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

हिंद-दी-चादर या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

हिंद-दी-चादर या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई – प्रतिनिधी: श्री गुरु तेग बहादूर साहेब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्ताने महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनात हिंद-दी -चादर’ या नृत्य नाट्य, गीतांच्या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन १२ ते २३ मार्च दरम्यान राज्यात आठ ठिकाणी करण्यात आले आहे.

हिंद-दी –चादर,श्रीगुरु तेग बहादुर जी यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. त्यांनी धर्म स्वातंत्र्य मानवता आणि सहिष्णुतेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांचे जीवनकार्य संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे. म्हणूनच त्यांना हिंद दी चादर (हिंदुस्थानचे रक्षण करणारी ढाल) असेही संबोधले जाते. म्हणूनच श्री गुरू तेग बहादुर यांच्या शहिदीच्या ३५०व्या वर्षपूर्तीनिमित्त नागपूर, नांदेड आणि नवी मुंबई येथे भव्य स्मरण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्री गुरू तेग बहादुर यांच्या बलिदानाची आठवण जागवणे, त्यांच्या विचारांचा प्रसार करणे तसेच समाजात एकता, बंधुता आणि आध्यात्मिक मूल्यांचे संवर्धन करणे असा या कार्यक्रमांचा मुख्य उद्देश, जो विविध धर्म, संप्रदाय व समाजघटकांना एकत्र आणणारा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा ठरणार आहे.

राज्यात आठ ठिकाणी आयोजन,पंजाबी भक्ती गीत, भांगडा नृत्य आणि नाट्यमय प्रसंग अशा कलाविष्कारांनी युक्त अशा ६० कलावंतांनी साकारलेला हा सांस्कृतिक सोहळा आहे. या ‘हिंद दी चादर’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे राज्यात केवळ आठ ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे.

(1). 12 मार्च- वाशी ( नवी मुंबई) साहित्य मंदिर सभागृह, सेक्टर 6.

(2) 13 मार्च-मीरा रोड (ठाणे) गानसम्राज्ञी लता मंगेशकर हॉल, मीरा रोड

(3) 14 मार्च – नांदेड,शंकरराव चव्हाण सभागृह सायं. 5:00 व

(4) 15 मार्च- छत्रपती संभाजीनगर यशवंतराव चव्हाण रंगमंदिर, सायं. 4:30 वा.

(5) 16 मार्च अकोला प्रमिलाताई ओक नाट्यगृह, अकोला सायं.6:30 वा.(6) 17 मार्च-नागपूर सायंटिफिक हॉल , नागपूर, सकाळी 11:00 वा.(7) 18 मार्च- नाशिक,कालिदास रंगमंदिर, नाशिक सायं. 5:00 वा.(8) 23 मार्च-पुणे, आचार्य अत्रे रंगमंदिर. पिंपरी चिंचवड सायं. 5:00 वा. असे आठ सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.हा सांस्कृतिक कार्यक्रम संपूर्णपणे मोफत असून नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्य शासन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने सांस्कृतिक कार्य संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

000

संबंधित पोस्ट

जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याअंतर्गतपीक पध्दती, पाण्याचे नियोजनाबाबत चर्चासत्र संपन्न..

परभणी जिल्ह्यातील यशवाडी येथील हनुमान मंदिरातील घटनेबाबत मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून, मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले 

अमली पदार्थ तस्करांवर कायद्याचा धाक यापुढेही कायम ठेवावा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- अमली पदार्थ टास्क फोर्सच्या आठव्या बैठकीत घेतला आढावा….

महाराष्ट्र दिनानिमित्त शहापूर वनविभागातील गुणवंत कर्मचाऱ्यांचा सन्मान..

लष्करप्रमुखांचा काश्मीर दौरा – अमरनाथ यात्रेपूर्वी सुरक्षा तयारीचा आढावा..

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा-पालखी सोहळ्याच्या काळात पालखी मार्गावर पोलीस दलाकडून इतर वाहनांना मनाई आदेश जारी*