vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अभियांत्रिकी, वैद्यकीय प्रवेश परीक्षा मार्गदर्शन योजना राबविण्यासाठीमुख्याध्यापकांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन..

अभियांत्रिकी, वैद्यकीय प्रवेश परीक्षा मार्गदर्शन योजना राबविण्यासाठीमुख्याध्यापकांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन..

        सांगली, प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इ. १० वी नंतर दोन वर्ष कालावधीमध्ये नामवंत खाजगी प्रशिक्षण संस्थेच्या साह्याने अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परीक्षांचे मार्गदर्शन करण्याच्या अनुषंगाने आदिवासी विकास विभागाकडील शासन निर्णयान्वये योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेकरीता अटी व शर्तीच्या अधिन राहून विहीत नमुन्यात व मुदतीत सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव चे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

अटी व शर्ती – चाळणी परीक्षेकरीता सर्व शासकीय, अनुदानित व EMRS शाळेतील अनुसूचित जमातीचे विद्यार्थी जे मार्च २०२५ च्या इ. १० वी च्या परीक्षेस बसलेले आहेत, त्यापैकी मागील वर्षी म्हणजेच २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात जे विद्यार्थी इ. ९ वी मध्ये गुणानुक्रमे पहिले ५ आले असतील (मुलांमध्ये गुणानुक्रमे पहिले ५ व मुलीमध्ये गुणानुक्रमे पहिल्या ५ आलेल्या असे एकूण १० विद्यार्थी) यांची निवड करावी. अशा प्रत्येक शाळेतून पहिले ५ मुले व पहिल्या ५ मुली यांची आवेदन पत्र विहीत नमुन्यात मुख्याध्यापक यांनी दिनांक २२ मार्च २०२५ पूर्वी प्रकल्प कार्यालयात जमा करावी. आवेदन पत्र भरलेल्या विद्यार्थ्यांचा इ. १० वी चा निकाल लागल्यानंतर तो प्रकल्प अधिकारी यांच्याकडे जमा करण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकाची असेल. या योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना शासन निर्णयामध्ये नमूद आहेत व तो संकेतस्थळावर उपलब्ध असून सर्व मुख्याध्यापकांनी त्यानुसार कार्यवाही करावी. चाळणी परीक्षा ही मे २०२५ मध्ये घेण्यात येईल याची सर्व मुख्याध्यापकांनी नोंद घ्यावी.

    प्रशिक्षणार्थीची सर्वसाधारण पात्रता पुढीलप्रमाणे – विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे. प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी त्याच शैक्षणिक वर्षांत दहावी उत्तीर्ण असावा. उमेदवाराची जमात ही महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या यादीमधील असणे आवश्यक, प्रशिक्षण प्रवेशासाठी उमेदवारांकडे जातीचा दाखला असणे बंधनकारक आहे. प्रवेश इच्छुक अनुसूचित जमातीच्या प्रशिक्षणार्थ्यांच्या कुटुंबाचे पालकाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रूपये पेक्षा कमी असावे.

00000

संबंधित पोस्ट

नुकसानग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल – मंत्री गिरीश महाजन,नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश; मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी ४ लाख रुपयाची मदत..

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई द्यावी – आमदार विलास तरे# जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांना दिले निवेदन…

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेमार्फत आदिवासी शेतकऱ्यांना सुधारित धान बियाणांचे वाटप कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर येथे प्रशिक्षणासह ३० अनुसूचित जमाती शेतकऱ्यांना लाभ

घरेलु कामगार आरोग्य तपासणी अभियानातील महिला रूग्णांवर पूर्णपणे मोफत उपचार करावेत  – जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघनःशहरात दोन रेस्टॉरन्ट्सवर कारवाई;परवाने निलंबित