vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेमार्फत आदिवासी शेतकऱ्यांना सुधारित धान बियाणांचे वाटप कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर येथे प्रशिक्षणासह ३० अनुसूचित जमाती शेतकऱ्यांना लाभ

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेमार्फत आदिवासी शेतकऱ्यांना सुधारित धान बियाणांचे वाटप

कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर येथे प्रशिक्षणासह ३० अनुसूचित जमाती शेतकऱ्यांना लाभ

गडचिरोली, प्रतिनिधी : भारतीय कृषी अनुसंधान परिषद, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्न कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी शेतकरी प्रशिक्षण व सुधारित धान बियाणे वितरण कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला. यावेळी चांदाळा, तुकुम, गिरोला व कन्हाळगाव येथील अनुसूचित जमाती समूहातील ३० शेतकऱ्यांना सुधारित धान बियाण्यांचे वितरण करण्यात आले.

 

कार्यक्रमास डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील कार्यकारी परिषद सदस्य शिवरामची घोडके, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरचे डॉ. दिपक नगराळे (समन्वय अधिकारी व वरिष्ठ शास्त्रज्ञ-वनस्पती रोगशास्त्र), डॉ. सुहास करकुटे (वरिष्ठ शास्त्रज्ञ) तसेच कृषी विज्ञान केंद्र, सोनापूरचे डॉ. किशोर की. झाडे (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख), डॉ. प्रितम एन. चिरडे (विषय विशेषज्ञ-कृषिविद्या), डॉ. विक्रम कदम (विषय विशेषज्ञ-पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र), सुचित के. लाकडे (विषय विशेषज्ञ-उद्यानविद्या) आणि कु. स्नेहा वेलादी (विषय विशेषज्ञ-कृषी अभियांत्रिकी) उपस्थित होते.

 

यावेळी शिवरामची घोडके यांनी नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून देत शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळण्याचे आवाहन केले. डॉ. दिपक नगराळे यांनी अनुसूचित जमाती विकास कृती आराखडा योजनेची माहिती देत शाश्वत पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. डॉ. सुहास करकुटे यांनी धान पिकातील किड व्यवस्थापन, डॉ. किशोर की. झाडे यांनी खरीप पीक नियोजन व हवामानाधारित तंत्रज्ञान, डॉ. विक्रम कदम यांनी पशुपालन व जनावरांच्या लसीकरणाचे महत्त्व, डॉ. प्रितम एन. चिरडे यांनी धान लागवड तंत्रज्ञान व हिरवळीच्या खताचा वापर, तर सुचित के. लाकडे यांनी भाजीपाला व फळपिक लागवडीबाबत मार्गदर्शन केले. कु. स्नेहा वेलादी यांनी कृषी यांत्रिकीकरणाविषयी माहिती दिली.

 

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अंकुश ठाकरे व शशिकांत सलामे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुचित के. लाकडे यांनी केले.

संबंधित पोस्ट

अपीलकर्त्याच्या गैरवर्तणुकीमुळे तीन वर्षे सुनावणीस बंदी-राज्य माहिती आयुक्तांचे आदेश

नांदेडमधील सहस्त्रकुंड धबधब्यात अडकल्या 5 महिला अन् 2 लहान मुलं यांना सुखरूप बाहेर काढले

vishwatmaklokswamivarta

मॅग्नेट 2.0 प्रकल्पाद्वारे पणन विषयक गुंतवणूक, कृषिमालाचे मूल्यवर्धन व रोजगारवाढीस गती देणार – पणन मंत्री जयकुमार रावल

vishwatmaklokswamivarta

परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीनिवडीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत

विद्यार्थ्यांनी पाठयपुस्तकापुरते मर्यादित न राहता अवांतर वाचनाची सवय ठेवावी- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,शाळेच्या पहिल्याच दिवशी विदयार्थ्यांची बैलगाडीतून वाजत-गाजत मिरवणूक मरळक येथे उत्साहपूर्ण वातावरणात शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षा अर्जास मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta