vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केली ऐरोली विभागातील विविध सेवासुविधांची पाहणी*

*नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केली ऐरोली विभागातील विविध सेवासुविधांची पाहणी*

 

          नवी मुंबई प्रतिनिधी -नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पुरविण्यात येणा-या सेवा – सुविधा लोकाभमुख असण्याकडे महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे विशेष लक्ष असून त्या अनुषंगाने त्यांनी ऐरोली विभाग कार्यालय, राजमाता जिजाऊ रूग्णालय, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक तसेच सेक्टर 3 व 4 मधील रस्ते, पदपथांची कामे यांची पाहणी करीत विविध सुधारणा सूचविल्या व त्या जलद करण्याचे निर्देश दिले.

*विभाग कार्यालयांमध्ये प्रभावी लोकाभिमुख कार्यप्रणाली राबविण्याचे व सुविधा पुरविण्याचे आयुक्त यांचे निर्देश*

   ऐरोली विभाग कार्यालयातील पाहणी दौ-यामध्ये त्यांनी 100 दिवसांच्या 7 कलमी कृती आराखड्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने अभ्यागतांसाठीच्या प्रतिक्षाकक्षातील आसनव्यवस्थेत वाढ करण्याचे व त्याठिकाणी पुस्तके, महानगरपालिकेची माहितीपुस्तके ठेवण्याचे निर्देश दिले, पिण्याच्या स्वच्छ व शुध्द पाण्याची व्यवस्था तसेच प्रसाधनगृहे नियमित स्वच्छ राहतील याची काळजी घेण्याचे सूचित करण्यात आले. कार्यालयातील अभिलेखाचे नियमानुसार निंदणीकरण, वर्गीकरण व जतन प्रक्रिया सुयोग्य व जलद करण्याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्याचप्रमाणे पाणीपट्टी व करभरणा केंद्रांतील कामांना गती देऊन नागरिकांना ऑनलाईन करभरणा सोप्या व सोयीच्या पध्दतीने करता येऊ शकते याची माहिती द्यावी व तशा प्रकारचे फलक लावून प्रचार-प्रसिध्दी करण्यात यावी असेही आयुक्तांनी सूचित केले. या इमारतीत असलेल्या परिमंडळ 2 विभागातील कार्यालयांच्या संयुक्त अभिलेख कक्षाची पाहणी करून अभिलेख मांडणी व जतन करण्याची आधुनिक कार्यपध्दती यांचाही अंगिकार करण्याचे निर्देश आयुक्तांनी देले. विभाग कार्यालयाशेजारील समाजमंदिर इमारतीची आवश्यक दुरूस्ती करून ती आणखी चांगल्या रितीने वापरात आणण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

—–“नागरिकांना विविध कामांसाठी विभाग कार्यालयांमध्ये यावे लागते. त्यामुळे त्याठिकाणी नागरिकांची कामे विहित वेळेत सहजतेने व्हावीत व त्यांना त्रास होऊ नये अशा रितीने नागरिकांना केंद्रीत ठेवून त्यांची बैठक व्यवस्था व इतर सेवा पुरविण्याचे निर्देश देण्यात आले असून कार्यालयीन स्वच्छता व सुविधांवर भर देण्यात येत आहे.” – डॉ. कैलास शिंदे, आयुक्त

*************************

संबंधित पोस्ट

26 मेपासून अकोला येथे जी.डी.सी.अँड ए व सी.एच.एम. परीक्षा

vishwatmaklokswamivarta

सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहात तात्पुरत्या स्वरूपात पद भरतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

नगरपरिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025 उमेदवारांना आता ऑफलाईन पध्दतीनेही नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार- रविवार दि.16 नोव्हेंबर या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई द्यावी – आमदार विलास तरे# जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांना दिले निवेदन…

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या  दुरुस्तीची तातडीने आवश्यकता;उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

तृतीयपंथीयांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन  : सहाय्यक आयुक्त देवीदास नांदगावकर