vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिकेची थकीत मालमत्ताकर वसुलीसाठी ढोलताशे मोहीम**मालमत्ताकर थकबाकीदार नवी मुंबई महानगरपालिकेच्या रडारवर*  *३१ मार्च २०२५ पूर्वी कर भरण्याचे मालमत्ताकर थकबाकीदारांना आवाहन* 

*नवी मुंबई महानगरपालिकेची थकीत मालमत्ताकर वसुलीसाठी ढोलताशे मोहीम**मालमत्ताकर थकबाकीदार नवी मुंबई महानगरपालिकेच्या रडारवर*  *३१ मार्च २०२५ पूर्वी कर भरण्याचे मालमत्ताकर थकबाकीदारांना आवाहन*

नवी मुंबई प्रतिनिधी*मालमत्ताकाराची थकबाकी भरणाऱ्या करदात्यांना नवी मुंबई महानगरपालिकेचे अभय*   थकीत मालमत्ताकर भरण्यासाठी नोटीसीद्वारे सूचित करूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मालमत्ताधारकांवर नवी मुंबई महानगरपालिकेने महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार मालमत्ताकर विभागाने कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात केली आहे.

 महानगरपालिकेच्या तुर्भे विभाग कार्यालयाने रेनबो बिझनेस पार्क येथील हावरे कमर्शियल काॅम्प्लेक्समध्ये मालमत्ताकराची थकबाकी करणाऱ्या २३२ आस्थापनांबाहेर ढोलताशे वाजवून त्यांना कर थकबाकी भरण्यासाठी जागे केले. १ कोटी २५ लाख रुपयांची मालमत्ताकर थकबाकी करणाऱ्या थकबाकीदारांच्या नावांची यादीही हावरे कमर्शियल काॅम्प्लेक्समध्ये जाहीरपणे लावण्यात आली. सदर कारवाई नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्भे विभाग कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी श्री.संजय तडवी यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आली.

कर थकबाकीदारांच्या कारवाईविषयी श्री. संजय तडवी यांनी माहिती दिली असून त्यानुसार हावरे कमर्शिअल काॅम्प्लेक्समध्ये एकूण २५३ आस्थापना आहेत. त्यातील २१ आस्थापनांनी मालमत्ताकर भरलेला आहे. उर्वरित २३२ आस्थापनांबाहेर ढोलताशे वाजवून त्यांना मालमत्ताकर भरण्यासाठी जागे करण्यात आले. शिवाय थकबाकीदारांच्या नावांची यादी त्यांनी करभरणा करणे बाकी असलेल्या रकमेसह त्यांच्या आस्थापनांबाहेर लावण्यात आली. ३१ मार्च २०२५ पूर्वी मालमत्ताकराची थकबाकी भरा, अन्यथा मालमत्ता सील करण्यात येईल असा इशाराही कर थकबाकीदार आस्थापना मालकांना देण्यात आला आहे.

   प्रशासकीय अधिकारी श्री. संजय तडवी यांच्या टीमने यापूर्वी वाशीच्या एपीएमसी मार्केट येथील एक्स्पोर्ट भवनमधील १० आस्थापनांवर कार्यवाहीचा बडगा उचलला होता. या आस्थापनांची ५६ लाख रुपयांची मालमत्ताकर थकबाकी असल्यामुळे त्यांना नवी मुंबई महानगरपालिकेद्वारे सील लावण्यात आले होते. दोन दिवसांत या मालमत्ताकरधारकांनी थकबाकी भरल्यामुळे त्या सीलमुक्त करण्यात आल्या असल्याची माहिती श्री. संजय तडवी यांनी दिली.

    अशाप्रकारे करवसुलीची कार्यवाही नवी मुंबई महानगरपालिकेने इतरही ठिकाणी केली. तुर्भेच्या भूमिराज सोसायटीमध्ये ढोलताशे वाजवून २.५ कोटी रुपयांची करवसुली करण्यात आली. नेरूळच्या अमेय सोसायटीने ३.५ कोटी रुपये मालमत्ताकराचा संपूर्ण भरणा केल्यामुळे सील केलेल्या मालमत्ता मोकळ्या करण्यात आल्या.

  मालमत्ताकर थकबाकीदारांना कर भरण्यासाठी कोणतेही आर्थिक दडपण येऊ नये यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने ‘अभय’ योजना सुरू केली आहे. मालमत्ताकर थकबाकीवरच्या शास्तीवर ५० टक्क्यांची सूट देणाऱ्या अभय योजनेचा लाभ घ्यावि आणि ३१ मार्च २०२५ या तारखेपूर्वी २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाचा मालमत्ताकर भरावा असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक डाॅ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील अमोघ बनसोडे या विद्यार्थ्याची साता समुद्रापार गुणवत्तापूर्ण झेप

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक_*मुंबईत प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदु राष्ट्रासाठी संघटितपणे कार्य करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !हिंदूंना आपली निर्णायक लढाई स्वत:च लढावी लागेल !* – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदू जनजागृती समिती

नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025निवडणूक प्रचार व प्रसिद्धीकरिता वापरण्यात येणाऱ्यावस्तू व सेवांचे दर निश्चितीबाबत आढावा बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

बँकांनी ग्राहकांच्या तक्रारीची गंभीरतेने दखल घ्यावी अन्यथा रिझर्व बँक कारवाईचा बडगा उगारणार, जनजागृती कार्यक्रम आणि बँकिंग तक्रार निवारण कार्यशाळेचे आयोजन

जनगणना २०२७: नागरिकांसाठी १५ मे पर्यंत ‘स्व-गणना’ करण्याची संधी

टेक-वारी 2.0’ अंतर्गत ‘जनरेटिव्ह एआय’ विषयावर विशेष तांत्रिक सत्र संपन्न