vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

26 मेपासून अकोला येथे जी.डी.सी.अँड ए व सी.एच.एम. परीक्षा

26 मेपासून अकोला येथे जी.डी.सी.अँड ए व सी.एच.एम. परीक्षा

बुलढाणा प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या गव्हर्नमेंट डिप्लोमा इन को-ऑपरेशन अँड अकाऊंटन्सी (जी.डी.सी. अँड ए.) तसेच सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम.) परीक्षा मे-२०२६ संदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहेया परीक्षेसाठी अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातील एकूण १९परीक्षार्थी सहभागी होणार आहेत. सदर परीक्षा दि. २६, २७ व २८ मे २०२६ रोजी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अकोला यांच्या मार्फत घेण्यात येणार आहे.

जी.डी.सी. अँड ए. व सी.एच.एम. परीक्षा २०२६ साठी अकोला-२३ या परीक्षा केंद्राचा पत्ता खंडेलवाल ज्ञानमंदिर स्कूल, श्री इंदिरादेवी मोहनलाल खंडेलवाल मेमोरियल हायस्कूल, विजय मिडलक्लास हाऊसिंग सोसायटी, गोरक्षण रोड, अकोला असा आहे. परीक्षेची वेळ सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत तसेच दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत राहणार आहे.

ज्या परीक्षार्थ्यांना तांत्रिक अडचणीमुळे प्रवेशपत्र डाउनलोड करता आलेले नाही, त्यांनी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. मुख्यालयाकडून प्राप्त उपस्थिती पत्रक व परीक्षार्थ्यांच्या छायाचित्र असलेल्या ओळखपत्राच्या पडताळणीनंतर त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. तरी सर्व परीक्षार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक जी.पी. साबळे यांनी केले आहे.
000000

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिकला सीआयटीआय टेक्सटाईल सस्टेनेबिलिटी राष्ट्रीय पुरस्कार 2026 प्रदान…

कबुतरखान्यांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात  आज तातडीची सुनावणी  – नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचं,कबुतरखान्यांवरील बंदी कायम; हायकोर्टाचे निरीक्षण, समिती नेमण्याचे आदेश

vishwatmaklokswamivarta

आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम; इच्छुकांकडून अर्ज मागविले..

vishwatmaklokswamivarta

माहिती उपसंचालक अर्चना गाडेकर – शंभरकर यांना कोल्हापूर विभागाच्या वतीने श्रद्धांजली…

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी ‘अधिस्वीकृती पत्रिका’ मिळविण्याची संधी; जिल्हा माहिती कार्यालयाचे आवाहन

आंतरराष्ट्रीय योग दिन; ‘माय भारत’ व ‘योगसंगम’ पोर्टलवर नोंदणी करा –जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन