vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आंतरराष्ट्रीय योग दिन; ‘माय भारत’ व ‘योगसंगम’ पोर्टलवर नोंदणी करा –जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

आंतरराष्ट्रीय योग दिन; ‘माय भारत’ व ‘योगसंगम’ पोर्टलवर नोंदणी करा –जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

 

बुलडाणा, प्रतिनिधी  : जिल्ह्यात येत्या २१ जून २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात व व्यापक सहभागासह साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर योगदिनाचे आयोजन अधिक प्रभावी व व्यापक स्वरूपात होण्यासाठी ‘माय भारत’ (My Bharat) आणि ‘योगसंगम’ (Yogsangam) या केंद्र शासनाच्या पोर्टल्सवर नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

योग हा भारताच्या प्राचीन व समृद्ध परंपरेचा अनमोल वारसा असून, शारीरिक, मानसिक व आत्मिक आरोग्यासाठी त्याचे महत्व अधोरेखित झाले आहे. योगामुळे तणाव निवारण, आरोग्यसंपन्न जीवनशैली आणि एकाग्रतेचा विकास साधता येतो. योगाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती वाढविण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील सर्व नागरिकांना, विशेषतः युवक व विद्यार्थ्यांना, https://mybharat.gov.in या पोर्टलवर स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या नोंदणीमुळे योग दिनाशी संबंधित उपक्रमांमध्ये भाग घेण्याची संधी मिळेल, तसेच योगसाधनेचे फायदे व त्याचे सामाजिक महत्व जनसामान्यांपर्यंत पोहोचवता येईल.

जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, योग संस्था, स्थानिक मंडळे व विविध सामाजिक संस्था यांनी https://yogsangam.nic.in या पोर्टलवर आपल्या योग दिन कार्यक्रम स्थळांची नोंदणी करावी. या प्रक्रियेमुळे देशभरातील सर्व योग कार्यक्रमांचे एकत्रीकरण होईल आणि नागरिकांना त्यांच्या नजीकच्या योग उपक्रमांची माहिती सहज उपलब्ध होईल. आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ अधिक व्यापक, सर्वसमावेशक आणि यशस्वी करण्यासाठी सर्व घटकांनी सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे..

0000

संबंधित पोस्ट

जनगणना 2027′ साठी तीन दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा लातूर दौरा कार्यक्रम…

vishwatmaklokswamivarta

माध्यमिक, उच्च माध्यमिक परीक्षा केंद्राच्या ठिकाणी मनाई आदेश लागू…

vishwatmaklokswamivarta

कृषि विभागाकडून शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे उगवण क्षमतेची प्रात्यक्षिके

मुंबईतील स्वच्छता विषयक ‘सुविधा केंद्र’ उपक्रम पथदर्शी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई महानगर प्रदेशात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला गती· मुंबईत २४ केंद्रे, ९ प्रगतीपथावर· ७.५ लाख नागरिकांना स्वच्छतेचे शिक्षण ५.५ लाख नागरिकांनी घेतला सुविधा केंद्राचा लाभ…

vishwatmaklokswamivarta

सार्वजनिक बांधकाम नागपूर प्रादेशिक विभागाअंतर्गत कामांचा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून आढावा

vishwatmaklokswamivarta