vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धा; 25 जुनपर्यंत अर्ज करा

जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धा; 25 जुनपर्यंत अर्ज करा

बुलडाणा, प्रतिनिधी: जिल्हास्तरीय सुब्रोता फुटबॉल कप, सबज्युनियर मुले, ज्युनियर मुले, मुली क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. दि. 1 ते 3 जुलै दरम्यान विविध वयोगटाच्या स्पर्धा घेण्यात येणार आहे. क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील शाळा, संघांनी दि. 25 जूनपर्यंत ऑफलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बि.एस. महानकर यांनी केले आहे.

जिल्हा क्रीडा परिषद तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा व सुब्रतो मुखर्जी स्पोर्ट्स एज्युकेशन सोसायटी, नवी दिल्ली यांच्या मार्फत 2025-26 या वर्षासाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूसाठी सबज्युनियर 15 वर्षा आतील मुले क्रीडा स्पर्धेसाठी खेळाडू दि. 1 जानेवारी 2011 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. तसेच ज्युनियर 17 वर्षाखालील मुले, मुली दि. 1 जानेवारी 2009 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.

जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप सबज्युनियर, ज्युनियर क्रीडा स्पर्धेत सहभागी सर्व संघानी जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागापूर्वीच www.subrotocup.in या संकेतस्थळावर खेळाडू आणि संघांनी नोंदणी करणे अनिवार्य आहे. सहभागी होणाऱ्या संघांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात ऑफलाईन नोंदणी दि. 25 जुनपर्यंत करणे आवश्यक आहे. प्रवेश अर्जावर खेळाडूचे संपुर्ण नांव, जन्मतारीख, वर्ग, आधार क्रमांक, शाळेचे नांव, पत्ता, शाळेचा युडायस क्रमांक, खेळाडू स्वाक्षरी, रजिष्टर नंबर, मोबाईल क्रमांक, संस्था प्रमुख, मुख्याध्यापक यांचे स्वाक्षरीने पाठवावा. 15 वर्षाआतील खेळाडूंकरीता वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे.

या स्पर्धेत सहभागी 15 वर्षाआतील मुले व 17 वर्षा आतील मुले, मुली यांची स्पर्धा दि. 1 ते 3 जुलै 2025 रोजी घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शाळा, संघांनी सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑफलाईन नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी डॉ.जिवन मोहोड, राज्य क्रीडा मार्गदर्शक (फुटबॉल) यांचेशी कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडा नगरी, जांभरुन रोड, बुलढाणा येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बि.एस.महानकर यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

जिल्हास्तरीय फुटबॉल युथ लिग स्पर्धा; 30 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन   

vishwatmaklokswamivarta

लॅटिन अमेरिकन वर्ड पोलीस फायर गेम साठी किशोर डांगे यांची निवड..

vishwatmaklokswamivarta

मिशन लक्षवेध योजनेअंतर्गत प्रतिभा विकास केंद्रात खेळाडूंना आर्चरी व ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

बुलढाण्याच्या अथर्व ताठेची राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी

जालना येथे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले ‘रजत पदक’भारताचे प्रतिनिधित्व करण्याची आणि ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याची इच्छा-साईशा पवार

vishwatmaklokswamivarta