vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कायाकल्प पुरस्कार योजना; बुलडाणा जिल्ह्यातील आरोग्य संस्थांची उल्लेखनीय कामगिरी

कायाकल्प पुरस्कार योजना; बुलडाणा जिल्ह्यातील आरोग्य संस्थांची उल्लेखनीय कामगिरी

बुलढाणा, प्रतिनिधी): नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या “कायाकल्प पुरस्कार योजना 2024-25” अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील विविध शासकीय आरोग्य संस्थांनी उत्कृष्ट कामगिरी करून विविध श्रेणींमध्ये पुरस्कार प्राप्त केले आहेत.

यामध्ये यामध्ये मेहकर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, जानेफळ या संस्थेला जिल्ह्यातील प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून 2 लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. तसेच सिंदखेड राजा तालुक्यातील उपकेंद्र, राजेगाव या संस्थेला उपकेंद्र श्रेणीत प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल 1 लाख रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. तसेच मलकापूर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयास प्रोत्साहनपर बक्षीस स्वरुपात 1 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय, उत्कृष्ट कामगिरीबद्दल 9 प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी 50 हजार रुपये असे प्रोत्साहनपर बक्षीस मिळणार आहे. यामध्ये हातेडी, किन्होळा, डोणगाव, गणेशपूर, एकलारा, सुलतानपूर, रोहणा, पिंपळगाव काळे व किनगाव राजा प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश आहे.

मलकापूर तालुक्यातील सावळी व कुंड उपकेंद्रांना अनुक्रमे दुसरा व तिसरा पुरस्कार प्राप्त झाला असून त्यांना 50 हजार व 35 हजार पारितोषिक देण्यात येणार आहे. उर्वरित 27 उपकेंद्रांना देखील प्रोत्साहनपर पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. प्रत्येक उपकेंद्राला 25 हजार रुपये पारितोषिक दिले जाईल. त्यामध्ये काळेगाव, कानझरा, दसरखेड, तालखेड, तरोडा, नायगाव दत्तपूर, रसूलपूर, लिहा, सेलूड, गोहेगाव, आसलगाव, कोर्हाळा, नांद्राकोळी, कोलवड, सारंबा, सुताळा, लव्हाळा, गाडेगाव, मंडपगाव, वेणी सुलतानपूर, झाडेगाव, बेलड, सावखेड नागरे, मासरूळ, ढाबा, तिकोडी व गोदरी या उपकेंद्रांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांनी दिली असून कायाकल्प योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आरोग्य संस्थांनी दिलेल्या सेवा व स्वच्छतेच्या निकषांवर आधारित ही निवड करण्यात आली आहे.

00000

संबंधित पोस्ट

रायगड जिल्ह्याच्या प्रगतीत बँक ऑफ इंडियाचा मोठा वाटा-जिल्हाधिकारी किशन जावळे*

जिल्ह्यात 14 ठिकाणी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ मेळाव्यांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

दिवाळी पहाट’ कार्यक्रम ; दादरला २१, मुलुंड येथे २२ ऑक्टोबरला

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांतील भूमिहीनांना मोफत शेतजमीनकर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत लाभ; प्रस्ताव ५ सप्टेंबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

लेखक विरेंद्र संघवी लिखित पुस्तक How to earn more money तरुणांसह उदयोग जगतासाठी वरदायी ठरणार

जन्म, मृत्यू, विवाह नोंदणी डिजीटल प्रक्रियेत अधिक अद्ययावतीकरणाचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश