vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

दिवाळी पहाट’ कार्यक्रम ; दादरला २१, मुलुंड येथे २२ ऑक्टोबरला

दिवाळी पहाट’ कार्यक्रम ; दादरला २१, मुलुंड येथे २२ ऑक्टोबरला…

मुंबई, प्रतिनिधी : सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनायाच्या वतीने यंदा राज्यभर दहा ठिकाणी व दिल्लीतही ‘दिवाळी पहाट’ या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक शिवाजी पार्क, दादर येथे २१ ऑक्टोबर रोजी आणि कालिदास नाट्यगृह (मुलुंड) येथे २२ ऑक्टोबरला दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन सकाळी ६.३० वाजता करण्यात आले आहे.

सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम साकारले जात आहेत.

दादर येथे आयोजित कार्यक्रमात जगदिश खेबुडकर, ग. दि. माडगुळकर व मंगेश पाडगांवकर यांच्या गाजलेल्या चित्रपट गीत व भावगीतांचा बहारदार कार्यक्रम ‘दिवाळी पहाट त्रिवेणी संगीत’ या विशेष संकल्पनेवर आयोजित सादरीकरण करण्यात येणार आहे. ख्यातनाम गायक दत्तात्रय मेस्त्री, अभिषेक नलावडे, प्रसिद्ध गायिका शाल्मली सुखटणकर, सोनाली कर्णिक, निवेदक अमित काकडे हे सादरीकरण करणार आहेत.

0000

संबंधित पोस्ट

मध्यवर्ती बसस्थानक, जुना रेणापूर नाका बसस्थानकावरून २३ जून पासून सुटणाऱ्या बस फेऱ्यांचे नियोजन जाहीर.

त्र्यंबक-नाशिकमध्ये सिंहस्थकुंभमेळा २०२७ चे आयोजन-कुंभमेळ्याच्या माध्यमातून येथे येणारा प्रत्येक भाविक भारताचे पर्यायाने महाराष्ट्राचे प्रतिबिंब सोबत नेणार आहे. त्यामुळे यशस्वी आयोजनातून जगाला आकर्षण वाटणारा कुंभमेळा करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

नवी मुंबई महानगरपालिका विभागात पाणीपुरवठाविषयक जाहीर आवाहन- नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सोमवार, दि. 25 मे 2026 पासून 10 % पाणी कपात ..

जम्मू-काश्मीरमधील वार्षिक श्री अमरनाथ यात्रा प्रतिकूल हवामानामुळे सलग सहा दिवस स्थगित राहिल्यानंतर आज पुन्हा सुरू …

चांदिवली परीसरात अंमली पदार्थविरोधी मोहीम : मोठ्या प्रमाणात कारवाई करणार- गृहराज्यमंत्री योगेश कदम

बेस्ट बससेवेबाबत मुंबईतील आमदारासमवेत बैठक घेणार- राज्यमंत्री माधुरी मिसाळ