vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जन्म, मृत्यू, विवाह नोंदणी डिजीटल प्रक्रियेत अधिक अद्ययावतीकरणाचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश

जन्म, मृत्यू, विवाह नोंदणी डिजीटल प्रक्रियेत अधिक अद्ययावतीकरणाचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देशनागरिकांना घरबसल्या करता येणार नोंदणी व मिळणार प्रमाणपत्रे अशा अत्याधुनिक सेवा प्रणालीकडे वाटचाल..

 

नवी मुंबई प्रतिनिधी- नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पुरविण्यात येणा-या सेवा – सुविधा नागरिकांना सुलभपणे उपलब्ध व्हाव्यात याकडे महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे बारकाईने लक्ष असून त्या अनुषंगाने सर्व सेवा डिजीटल करून नागरिकांना महानगरपालिकेच्या कोणत्याही कार्यालयात जावे न लागता महानगरपालिकेशी संबंधित विविध प्रमाणपत्रे, परवाने, ना हरकत प्रमाणपत्रे त्यांना घरीच उपलब्ध व्हावीत यादृष्टीने आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली डिजीटल सेवाप्रणालीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गतीमानतेने अद्ययावतीकरण करण्यात येत आहे.

 मुख्यमंत्री महोदय यांच्या संकल्पनेतील 100 दिवसांचा सात कलमी कृती आराखडा राबवितानाही सेवासुविधांची लोकाभिमुख सुलभता व गतीमानता यावर भर दिला जात असून महानगरपालिकेच्या विविध कार्यालयांना भेटी देत आयुक्त विद्यमान कार्यप्रणालीत अधिक गतीमान सुधारणेच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलत आहेत.

 या अनुषंगाने कोपरखैरणे विभाग कार्यालयाला भेट देत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी कार्यालयीन स्वच्छता व अभिलेखाचे निंदणीकरण, मांडणी अशा सर्वच बाबींची बारकाईने पाहणी केली. त्यामध्ये नागरी सुविधा केंद्राच्या बाहेरील बैठक व्यवस्थेमध्ये वाढ करण्याच्या सूचना केल्या.

 जन्म – मृत्यू नोंदीविषयक कार्यालयीन दप्तराची पाहणी करताना आयुक्तांनी ही प्रणाली नागरिकांना अधिक सोयीची होण्याच्या दृष्टीने विद्यमान डिजीटल प्रणालीत आवश्यक बदल करण्याचे निर्देश दिले, जेणेकरून नागरिकांना घरबसल्या नोंदणी करता येईल व घरीच प्रमाणपत्र प्राप्त होईल.

त्याचप्रकारे विवाह नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ करून ज्याप्रमाणे पासपोर्टसाठी ऑनलाईन अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे डिजीटली अपलोड करण्यात येतात व संबंधितांना कागदपत्रे घेऊन हजर राहण्याचा दिनांक संदेशाव्दारे पाठविला जातो, तशीच प्रणाली राबविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. सदर अर्ज नागरिक स्वत: करू शकतात तसेच सेतू कार्यालयातूनही करू शकतात अशाप्रकारे जलद सुविधा करावी असे आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.

 डेब्रिज परवानगी तसेच मैदाने वापर परवानगी यामध्येही सुधारणा करून सर्व यंत्रणा डिजीटली कराव्यात तसेच या प्रमाणपत्रांसाठी आवश्यक कागदपत्रांच्या यादीचा फलक तळमजल्याप्रमाणेच पहिल्या मजल्यावरही दर्शनी भागात प्रदर्शित करण्याचे सूचित करण्यात आले. त्याचप्रमाणे सर्व प्रमाणपत्र वितरण विषयक बाबींची रजिस्टरमध्ये रितसर नोंद करून ठेवावी व विभाग अधिका-यांनी ते तपासून नियंत्रण ठेवावे असेही निर्देश सहा. आयुक्त श्री. वसंत मुंडावरे यांना दिले. मैदाने वापर परवानगीची सुलभ नियमावली तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

 मालमत्ताकर हस्तांतरण प्रणाली तसेच मालमत्ता मूल्यांकन प्रणाली अधिक सुलभ करण्यासाठी तसेच त्यामध्ये संपूर्ण डिजीटलायझेशन करण्याच्या दृष्टीने तत्परतेने सुधारणा करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

 विभाग कार्यालय हद्दीतील संस्था, शाळा, महाविद्यालये, रूग्णालये, स्वयंसेवी संस्था अशा सर्व खाजगी बाबींच्याही नोंदी महानगरपालिकेकडे ठेवाव्यात असेही निर्देश आयुक्तांनी दिले.

 या पाहणी दौ-यात आयुक्तांनी कोपरखैरणे माता बाल रूग्णालयाच्या कामाचीही पाहणी करून आवश्यक बदल सूचविले. त्यामध्ये प्रामुख्याने रस्त्यावरील दोन्ही प्रवेशव्दारांचे विस्तारीकरण करण्याचे व त्यामधील अडथळे दूर करण्याचे सूचित केले.* तसेच काम जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देशही वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत जवादे, उपआयुक्त डॉ.अजय गडदे, कार्यकारी अभियंता श्री.अजय संख्ये यांना दिले.

 100 दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत मुख्यालयासह महानगरपालिकेची विभाग कार्यालये, रूग्णालये, शाळा व इतर कार्यालयांमध्ये सात कलमांनुसार महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जलद गतीने कार्यवाही सुरू असून महानगरपालिका कार्यालयांचे रूप बदलल्याचे चित्र पहायला मिळत आहे. तसेच सेवापूर्ततेतही प्रभावी डिजीटलायझेशनमुळे सेवा पुर्ततेत सुलभता व गतीमानता आलेली आहे, याबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीची विशेष मोहिम-विज्ञान शाखेच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आता महाविद्यालयात मिळणार जात वैधता प्रमाणपत्र…

महसूल विभागाने जबाबदारी घेऊन कार्य करावे-अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे*महसूल विभागाच्या विविध कार्यालयांना भेटी

मुंबईच्या दादर येथे आज ५ जाने.राणी दुर्गावती ५०० वी व अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती वर्षानिमित्त ‘मानवंदना संचलनात, ३ हजार तरुणीचा सहभागी होणार…

पुणे स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्धएकूण ८६७ मतदारांचा समावेश; ४४१ पुरुष व ४२६ महिला मतदार..

मराठी भाषेच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक….

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू