vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मागासवर्गीय, दिव्यांग व्यक्तिंनी घरकुल योजनेच्या,लाभासाठी पंचायत समितीकडे अर्ज करण्याचे आवाहन

मागासवर्गीय, दिव्यांग व्यक्तिंनी घरकुल योजनेच्या,लाभासाठी पंचायत समितीकडे अर्ज करण्याचे आवाहन

 

सांगली, प्रतिनिधी : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून सन 2024-25 मधील स्वीय निधीतून मागासवर्गीय, दिव्यांग व्यक्तींना घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील पात्र लाभार्थींनी संबंधित पंचायत समितीकडे अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. अर्जदाराने पंचायत समिती स्तरावर विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक असून, पंचायत समिती स्तरावरून प्राप्त झालेल्या पात्र अर्जदारांच्या यादीमधून लाभार्थी निवड सोडत (लकी ड्रॉ) पध्दतीने करण्यात येणार आहे.

योजनांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.१) ग्रामीण भागातील मागासवर्गीय व्यक्तिंना (पुरूष व महिला) (अ.जा.,

अ.ज., वि.जा.भ.ज.. व नवबौध्द) नवीन घरबांधणीसाठी आर्थिक सहाय्य करणे – पात्रतेचे निकष – १) अर्जदार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, नवबौध्द या प्रवर्गातील असावा/असावी. २) अर्जदाराच्या कुटुंबाचे मागील आर्थिक वर्षाचे एकूण उत्पन्न रु.१,००,०००/- च्या आत असावे. ३) अर्जदार महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असावा. ४) अर्जदाराने या किंवा शासनाकडील अन्य घरकुल योजनेचा यापूर्वी लाभ घेतलेला नसावा.५) अर्जदाराच्या कुटुंबातील कुणीही व्यक्ती शासकीय व निमशासकीय नोकरीत नसावी. ६) एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला सदर योजनेचा लाभ घेता येईल. ७) अर्जदाराच्या स्वत: च्या नावे असणाऱ्या जागेचा ८ अ उतारा असेसमेंट लिस्ट नुसार- किमान क्षेत्रफळ २६९ चौ. फूट असावे. ८) गावात अर्जदाराचे किंवा त्याच्या कुटुंबियांच्या नावे कोणतेही पक्के घर नसावे.

२) दिव्यांग घरकुल योजना – ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींना घरबांधणीसाठी आर्थिक सहाय्य करणे. या योजनेच्या लाभासाठी अर्जदाराचे दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान 40 टक्के असावे. अन्य निकष उपरोक्त योजनेतील निकष क्रमांक 2 ते 8 समान आहेत.

00000

संबंधित पोस्ट

परिवहन सेवांसाठी अधिकृत संकेतस्थळांचा वापर करावा Ø परिवहन विभागाचे नागरिकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

स्मृतीचा केवळ सांगलीकरांनाच नव्हे तर देशवासियांनाही अभिमान- पालकमंत्री चंद्रकांत पाटील श्रीनिवास मानधना यांच्या निवासस्थानी भेट देऊन केले विशेष अभिनंदन,बाबा…. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत तुमच्या लेकीने इतिहास घडवला! असे गौरवोद्गार

vishwatmaklokswamivarta

फणसावरील संशोधनासाठी कृषी विद्यापीठांतर्गत केंद्र स्थापन करण्यात येईल- कृषिमंत्री ॲङ माणिकराव कोकाटे स्वतंत्र संशोधन केंद्र स्थापन करण्याबाबत सदस्यांच्या भावना विचारात घेऊनबैठक घेण्याचे सभापतींचे निर्देश..

राष्ट्रपती भवनाच्या कॉरिडॉरमध्ये ब्रिटिश व्हाइसरॉयच्या तैलचित्रांच्या जागी आता परमवीर चक्र विजेत्या शूरवीरांची तैलचित्रे..

vishwatmaklokswamivarta

वैद्यकीय पर्यटन सुरू करावे- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

अगस्ति ऋषी मंदिर विकासासाठी शासन कटिबद्ध – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ प्रादेशिक पर्यटन योजना निधीतून अगस्ति ऋषी मंदिर सभामंडप आणि संरक्षक भिंत कामांचे भूमिपूजन

vishwatmaklokswamivarta