vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जी.डी.सी. अँड ए परीक्षेचे अर्ज करण्यासाठी 25 फेब्रुवारीपर्यंत मुदत..

जी.डी.सी. अँड ए परीक्षेचे अर्ज करण्यासाठी 25 फेब्रुवारीपर्यंत मुदत…

 

       सांगली, प्रतिनिधी : शासकीय सहकार व लेखा पदविका ( जी.डी.सी. अँड ए ) परीक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी. एच. एम. ) परीक्षा दिनांक 23, 24 व 25 मे 2025 रोजी घेण्यात येणार असून त्यासाठी दिनांक 25 फेब्रुवारी 2025 पर्यंत फक्त ऑनलाईन पध्दतीनेच अर्ज करता येईल, अशी माहिती जी.डी.सी.ॲण्ड ए.बोर्डाचे सचिव यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

जी. डी. सी. ॲण्ड ए बोर्डाच्या https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरच स्वत:चा User ID व Password तयार करुन या परीक्षेसाठी दिनांक 9 जानेवारी ते दिनांक 25 फेब्रुवारी 2025 या कालावधीत फक्त ऑनलाईन पध्दतीनेच अर्ज करता येईल. परीक्षेसाठी लागणारी आवश्यक अर्हता, अनुभव, आवश्यक कागदपत्रे, ऑनलाइन अर्जासाठी तपशील, परीक्षा केंद्र, शुल्क, परीक्षेच्या अटी व नियम, सूट अभ्यासक्रम व इतर तपशिलासाठी सविस्तर अधिसूचना https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर `महत्वाचे दुवे` मधील `जी.डी.सी. ॲण्ड ए. मंडळ” येथे उपलब्ध आहेत. 00000

संबंधित पोस्ट

सर्वोच्च न्यायालयात विशेष लोकअदालत;३१ मे पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत…

छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंतीचा उत्सव आजपासून बुलढाण्यात..प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांची यावर्षी रेलचेल!

vishwatmaklokswamivarta

उन्हाळी भुईमुग पिकासाठी शंभर टक्के अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहिम; ९.८६ कोटी मतदारांच्या घरी पोहोचणार निवडणूक यंत्रणा

अनुसूचित जमाती कल्याण समितीची शाळा, आरोग्य केंद्राला भेटी

समीर गायकवाड’सारखे आणखी किती बळी आपण जाऊ देणार ?समीर गायकवाड यांच्या श्रद्धांजली सभेत हिंदुत्वनिष्ठांचा संतप्त प्रश्न..

vishwatmaklokswamivarta