vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

उमेदच्या वतीने गुरूवारपासून पाचदिवसीय मिनी सरस प्रदर्शन  

उमेदच्या वतीने गुरूवारपासून पाचदिवसीय मिनी सरस प्रदर्शन

 

       सांगली, प्रतिनिधी : केंद्र व राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या संयुक्त विद्यमाने दि. २३ ते २७ जानेवारी, २०२५ या कालावधीत बचत गट वस्तू विक्री प्रदर्शन मिनी सरसचे आयोजन करण्यात आले असून, याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका श्रीमती नंदिनी घाणेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

  पत्रकात म्हटले आहे, उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कार्यरत स्वयंसहाय्यता समुहांनी व समुहातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडिअम, काँग्रेस भवनजवळ, सांगली येथे दि. २३ ते २७ जानेवारी, २०२५ या कालावधीत सकाळी १० ते रात्री १० या वेळेत होणार आहे.

    यामध्ये बचत गटांनी उत्पादित केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंचे ५४ स्टॉल व खाद्यपदार्थांचे २१ स्टॉल सहभागी होणार आहेत. या प्रदर्शनास भेट देणाऱ्या लोकांच्या मनोरंजनासाठी खास मनोरंजनाचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. बालगोपाळांसाठी आकाश पाळण्यासह विविध प्रकारची खेळणीही या सरस मध्ये सहभागी असतील. तसेच पाककला स्पर्धा आयोजित केलेली आहे, सर्वोच्च खरेदीवर आकर्षक भेट वस्तू देण्यात येणार आहेत. तसेच दररोज रात्री सायंकाळी ७ ते १० सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धेचे आयोजन केले आहे.

तरी सर्व सांगलीकरांनी सर्व पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे.00000

संबंधित पोस्ट

ठाणे ग्रामीण जिल्ह्यात आज 15 मे पासून प्रतिबंधात्मक आदेश लागू

पत्रकार दिनासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता या भविष्यवेधी संकल्पनेची निवड योग्य- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन ‘महाराष्ट्राची पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स मीडिया हॅकॅथॉन’चे उद्घाटन

फसव्या भरती संदेशापासून सावधान; आरोग्य विभागाचे नागरिकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

डोंगरांवरील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी धोरण तयार करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या कामांचा आढावा

वर्धा जिल्ह्यातील ‘बोर’, ‘धाम’ सिंचन प्रकल्पांच्या नुतनीकरणासाठी ४२८ कोटी ९६ लाख..