vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

देशी गायींच्या पालनपोषण अनुदान योजनेसाठी,अर्ज करण्यासाठी 26 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

देशी गायींच्या पालनपोषण अनुदान योजनेसाठी,अर्ज करण्यासाठी 26 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

 

       व्यावसायिक प्रतिनिधी- सांगली,  : ग्रामीण भागातील गोशाळा संचालकांना ऑनलाईन अर्ज भरतांना आलेल्या तांत्रिक अडचणी तसेच काही अपरिहार्य कारणांमुळे देशी गाईंसाठी अनुदान योजना अंतर्गत अर्ज न करू शकलेल्या परंतु प्रत्यक्षात सदर योजनेचा लाभास पात्र असणाऱ्या गोशाळांना अर्ज करण्याकरिता २६ जानेवारी २०२५ पर्यन्त मुदतवाढ देण्यात आली असल्याचे सहआयुक्त पशुसंवर्धन डॉ. मंजूषा पुंडलिक यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

गोसेवा आयोगाकडील नोंदणीकृत गोशाळांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरिता सन २०२४-२५ पासून गोशाळेत ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालनपोषणासाठी प्रति दिन प्रति गोवंश पन्नास रूपये अनुदान देण्यात येते. यासाठी जिल्ह्यातील गोसंगोपनाचा किमान ३ वर्ष अनुभव असलेल्या, गोशाळेत किमान ५० गोवंश व संस्थेतील ईयर टॅगिंग (भारत पशुधन प्रणालीवर) असलेले तसेच गोसेवा आयोगाकडील नोंदणीकृत गोशाळा, गोसदन, पांजरपोळ व गोरक्षण संस्थांमधील देशी गाई अनुदानास पात्र आहेत.

या योजनेचे सुधारित नियोजित वेळापत्रक, अटी व शर्ती, अंमलबजावणी, योजनेचा ऑनलाईन अर्ज व त्यासोबत जोडावयाची अनुषंगिक कागदपत्रे इत्यादी बाबतची सविस्तर माहिती https://schemes.mahagosevaayog.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच यापूर्वी अर्ज केलेल्या परंतु त्रुटी पूर्तता करिता अर्जदारास परत पाठविण्यात आलेल्या गोशाळांची यादी त्रुटी पूर्तता करिता संकेतस्थळावरील “त्रुटी असलेले अर्ज” या मेनू वर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.

00000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत १०० टक्के उद्दिष्टपूर्तीप्रमुख बँक अधिकारी व शाखा व्यवस्थापकांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

जिल्हाभरात पोळा सणापासून ते दीपावलीपर्यंत दुध व दुग्धजन्य पदार्थांची भेसळ रोखण्यासाठी मोहीम

गणेश उत्सवासाठी पोलिस व जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण जिल्ह्यात 1 लाख 2 हजार 198 खासगी तर 286 सार्वजनिक मंडळाचे गणपती उत्सवासाठी गावी परतणाऱ्या कोकण वासियांच्या सुविधांसाठी यंत्रणा सतर्क…

विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियानातूनयुवकांच्या जीवनाला सकारात्मक दिशा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियानाचे उद्घाटन,- अमली पदार्थ प्रतिबंधविषयक होणार जनजागृती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची संकल्पना- 18 जुलैपर्यंत चालणार अभियान

vishwatmaklokswamivarta

नवी दिल्लीत १२ आणि १३ सप्टेंबरला होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पहिल्या iBRICS परिषदेचं आयोजन 

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील बंदर विकासाच्या ४२ प्रकल्पांना केंद्रीय मान्यता मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट