vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाभरात पोळा सणापासून ते दीपावलीपर्यंत दुध व दुग्धजन्य पदार्थांची भेसळ रोखण्यासाठी मोहीम

जिल्हाभरात पोळा सणापासून ते दीपावलीपर्यंत दुध व दुग्धजन्य पदार्थांची भेसळ रोखण्यासाठी मोहीम

जालना प्रतिनिधी :- जिल्ह्यात पोळा सणापासून ते दीपावली सणापर्यंत दुध व दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती फार मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे दुध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गोष्टीला पायबंद घालण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिलेल्या निर्देशानूसार धडक तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. तरी अशा दुध वदुग्धजन्य पदार्थांच्या भेसळीची माहिती देण्यात यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दुध वदुग्धजन्य पदार्थांमध्ये केल्या जाणाऱ्या भेसळीमुळे सर्वसामान्य लोकांच्या तसेच लहान मुलांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होतो. तसेच दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या गुणवत्तापुर्ण दुधास योग्य दर मिळत नाही पर्यायाने शेतकऱ्यांचे नुकसान होते व भेसळखोर स्वत:चा फायदा करुन घेतात. दुध व दुग्धजन्य पदार्थांतील बाजार पेठेत होणारी भेसळ रोखण्यास जिल्हास्तरीय समिती मार्फत धडक मोहिम राबविण्यात येणार असून बाजार पेठेत होणाऱ्या भेसळीबाबतची माहिती अपर जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे देण्यात यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल. जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार दुध व दुग्धजन्य पदार्थ मिळण्याच्या दृष्टीने मोहीम राबविण्यात येत आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

जिल्हा प्रकल्प अंमलबजावणी कक्ष स्मार्ट प्रकल्पांतर्गत इंदोर येथे प्रशिक्षणासह अभ्यास दौरा संपन्न..

जिल्ह्यात दमदार पाऊस; प्रशासन हायअलर्टवर, नागरिकांनी सतर्क राहावे – पालकमंत्री मकरंद जाधव पाटील

जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क;लसीकरण मोहिमेला वेग -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्तीसगड | दंतेवाडा जिल्ह्यात १२ माओवादी कार्यकर्त्यांनी शरणागती पत्करली, ९ माओवादी कार्यकर्त्यांवर एकूण २८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते.

पनवेल येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन

ॲग्रीस्टॅक नोंदणी, शून्य प्रलंबितता कामे पूर्ण करा- जिल्हाधिकारी स्वामी