vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

स्मृतीचा केवळ सांगलीकरांनाच नव्हे तर देशवासियांनाही अभिमान- पालकमंत्री चंद्रकांत पाटील श्रीनिवास मानधना यांच्या निवासस्थानी भेट देऊन केले विशेष अभिनंदन,बाबा…. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत तुमच्या लेकीने इतिहास घडवला! असे गौरवोद्गार

स्मृतीचा केवळ सांगलीकरांनाच नव्हे तर देशवासियांनाही अभिमान- पालकमंत्री चंद्रकांत पाटील श्रीनिवास मानधना यांच्या निवासस्थानी भेट देऊन केले विशेष अभिनंदन,बाबा…. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत तुमच्या लेकीने इतिहास घडवला! असे गौरवोद्गार

    सांगली, प्रतिनिधी- बाबा… स्मृतीने, तुमच्या लेकीने, आणि तिच्या सर्व सहकाऱ्यांनी इतिहास घडवला. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेट विश्वचषकावर भारताचे नाव कोरले. केवळ सांगलीकरच नाही; तर प्रत्येक भारतीयाला टीम इंडियाचा अभिमान आहे, असे गौरवोद्गार राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महिला क्रिकेट टीम इंडियाची उपकर्णधार आणि सांगलीची कन्या स्मृती मानधनाच्या कुटुंबियांच्या भेटीप्रसंगी काढले.

      आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला नमवत ऐतिहासिक विजय मिळवला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी टीम इंडियाची उपकर्णधार आणि सांगलीची कन्या स्मृती मानधनाच्या निवासस्थानी काल जाऊन तिच्या आई-वडिलांचे विशेष अभिनंदन केले. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना, आई स्मिता, भाऊ श्रावण उपस्थित होते.

     यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, स्मृती मानधना आणि तिच्या सर्व सहकाऱ्यांनी विश्वचषक जिंकून इतिहास घडवला आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीय अभिमान व्यक्त करत आहे. ह्या मुलींच्या कामगिरीमुळे ग्रामीण भागातील प्रत्येक मुलगी आकाशाला गवसणी घालेल. त्यांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करतील आणि यातून देशाचा नावलौकिक वाढवतील, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

00000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्यास प्राधान्य- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- उद्योग विभागाच्या समित्यांच्या आढावा बैठकीत दिली ग्वाही- एनएबीएल टेस्टिंग लॅब प्रकल्पात अधिकाधिक उद्योजकांनी सहभागी होण्याचे आवाहन- उद्योगांना पीएनजी गॅस पुरवठ्याची कार्यवाही 15 दिवसात करण्याचे निर्देश

इराणने मर्यादा ओलांडल्यास पुन्हा हवाई हल्ले; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा 

शेलमालास रास्त भाव मिळण्यासाठीराष्ट्रीय नामांकित बाजारतळ स्थापन करणे सुलभ होणार.. ‘ई-नाम’ योजनेच्या प्रभावी अंमलबाजवणीसाठी अधिनियमात सुधारणेस मान्यता..

राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अमली पदार्थविरोधी विशेष पथक स्थापन करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. 

अमरनाथ यात्रेला भक्तांचा जत्था रवाना..

समीर गायकवाड’सारखे आणखी किती बळी आपण जाऊ देणार ?समीर गायकवाड यांच्या श्रद्धांजली सभेत हिंदुत्वनिष्ठांचा संतप्त प्रश्न..

vishwatmaklokswamivarta