vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

वैद्यकीय पर्यटन सुरू करावे- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

वैद्यकीय पर्यटन सुरू करावे- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

 

            मुंबई, प्रतिनिधी: अनेक परदेशी पर्यटक वैद्यकीय सोयी सुविधांसाठी भारतात येत असतात त्या दृष्टीने महाराष्ट्रात वैद्यकीय पर्यटन सुरू करावे, असे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.  मंत्रालयात पर्यटन मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळाची १७३वी बैठक झाली. या बैठकीस पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

  यावेळी टुरिस्ट गाईड प्रोग्राम, वैद्यकीय पर्यटन पुन्हा सुरू करणे, जंगल सफारी येथे कॅरॅव्हॅन सुरू करणे, इत्यादींविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. महाबळेश्वर येथे ११ महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर हेलिकॉप्टर सुविधा सुरू करणे तसेच तापोळा, वासोटा, प्रतापगड येथे पर्यटकांच्या सोयीसाठी हेलिपॅड उभारण्यास परवानगी मिळवणे, महाबळेश्वर येथे टुरिस्ट गाईड, पर्यटकांकडून अतिरिक्त शुल्क आकारू नयेत यासाठी गाईड प्रोग्रामची अंमलबजावणी करावी. या प्रोग्राममध्ये अधिक सक्षम प्रमाणीकरण करावे, अशा सूचना पर्यटनमंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.

संबंधित पोस्ट

जालना महापालिकेत GST अनुदान मंजूर झाल्याबद्दल आनंद…

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत आयोजित ‘संवादवारी’ उपक्रमाअंतर्गत प्रदर्शन, चित्ररथ, एलईडी व्हॅन , कलापथक, पथनाट्याच्या माध्यमातून शासकीय योजनांचा जागर सुरू आहे. तरडगाव व फलटण येथे या उपक्रमाला वारकरी व ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला.चित्ररथाचे विशेष आकर्षण

परवानाधारकाकडील शस्त्रे पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्याचे जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे निर्देश • शस्त्रे जमा करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना

vishwatmaklokswamivarta

शेतीवर आधारित उपप्रकल्प करावेत*-माविम व्यवस्थापकीय संचालक राजलक्ष्मी शाह मुंबई*

कार्तिकी एकादशीच्या शुभदिनी पंढरपुरातील विठ्ठलाच्या मंदिरात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवार सहकुटुंब शासकीय महापूजा संपन्न बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल करावा विठ्ठल, जीवभाव…

vishwatmaklokswamivarta

शारीरिक, मानसिकदृष्ट्या भक्कम राहण्यासाठी योग साधना आवश्यक – ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे- जिल्हा परिषदेने योग दिनी साधला विश्वविक्रमी भक्तियोग- चितळे डेअरी आणि विश्व योगदर्शन केंद्र यांच्यासह संयुक्त उपक्रम- ⁠जवळपास साडेपाच लाख योगप्रेमींचा सहभाग- ⁠एकाच वेळी तीन विश्वविक्रमांना गवसणी- ⁠वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद- ग्रामीण भागातून भरभरून प्रतिसाद…