vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीची विशेष मोहिम-विज्ञान शाखेच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आता महाविद्यालयात मिळणार जात वैधता प्रमाणपत्र…

जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीची विशेष मोहिम-विज्ञान शाखेच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आता महाविद्यालयात मिळणार जात वैधता प्रमाणपत्र…

 

जालना, प्रतिनिधी:- इयत्ता अकरावी व बारावीमध्ये विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या 100 दिवस उद्दिष्ट पुर्ती कार्यक्रमातंर्गत संबंधित महाविद्यालयातच जात वैधता प्रमाणपत्र मिळणार आहे. तरी जालना जिल्ह्यातील काही महाविद्यालयामध्ये जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून शिबिरे आयोजित करण्यात आले असून त्याच ठिकाणी संबंधित विद्यार्थ्याचा अर्ज स्विकारून जात वैधता प्रमाणपत्र दिले जाणार आहे. अशी माहिती उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या निर्देशानुसार दि. 1 जानेवारी 2025 पासून पुढे 100 दिवस या कालावधीत 100 दिवस उद्दिष्ट पुर्ती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. जालना जिल्ह्यातील इयत्ता अकरावी व बारावीमध्ये विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासप्रवर्ग व सामाजिक आर्थिक मागास प्रवर्ग एसईबीसी (मराठा) या मागास प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांना जातीच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, जालना यांच्यावतीने विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता अकरावी व बारावीमध्ये विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, पशुसंवर्धन, वास्तुशास्त्र, फार्मसी, विधी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमात आरक्षित जागेवर प्रवेश घेण्यासाठी तसेच सदर अभ्यासक्रमाचे शिक्षण शुल्काची प्रतिपुर्ती करण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते.

इयत्ता अकरावी व बारावीमध्ये विज्ञान शाखेतील विद्यार्थी वेळेत त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव समितीकडे दाखल करीत नाहीत, पर्यायाने अशा विद्यार्थ्यांना या सवलतीचा लाभ मिळत नाही. ही अडचण विचारात घेऊन शैक्षणिक वर्ष 2024-25 तसेच 2025-26 मध्ये इयत्ता अकरावी व बारावीमध्ये विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग, सामाजिक आर्थिक मागास प्रवर्ग, एसईबीसी (मराठा) या मागास प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या जातीच्या प्रमाणपत्राची पडताळणी करणयात येत आहे. त्याकरिता संबंधित मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन करावेत. या अर्जाची हार्ड कॉपी संबंधित महाविद्यालयात दाखल करावी व संबंधित महावि‌द्यालयांनी असे अर्ज या कालावधीत फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जालना यांच्याकडे सादर करावेत. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

-*-*-*

संबंधित पोस्ट

जिल्हास्तरीय N-CORD समितीची आढावा बैठक ठाण्यात 8.24 कोटींचा अंमली पदार्थांचा मोठा मुद्देमाल जप्त..

vishwatmaklokswamivarta

डिसेंबर महिन्यात गोल्डन कार्डसाठी विशेष मोहिम   – जिल्हाधिकारी आशिष येरेकर*उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा सेविकांचा सन्मान….

vishwatmaklokswamivarta

हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार सुरुच, तब्बल 10 ठिकाणी आभाळ फाटल्याने शेकडो घरी वाहून गेली; 5 जणांचा मृत्यू, 11 जणांचा शोध सुरुच, 100 गावांमध्ये बत्ती गुल…

बेवारस दुचाकी वाहनांच्या मालकी हक्काचा पुरावा सादर करुन**वाहने घेऊन जाण्यासाठी पोलीस विभागाचा जाहीरनामा*

vishwatmaklokswamivarta

किसान क्रेडिट कार्डधारकांना राज्य शासनाकडून ४ टक्के व्याज सवलत मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यास यश

vishwatmaklokswamivarta

शिक्षकांच्या निवृत्ती वेतन योजनेत सुधारणेविषयी निर्णय लवकरच– उद्योग मंत्री उदय सामंत