vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती-डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आज पासून दोन दिवसीय विद्वत परिषदेचे आयोजन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती-डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आज पासून दोन दिवसीय विद्वत परिषदेचे आयोजन

 

राज्य प्रतिनिधी -छत्रपती संभाजीनगर, :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याच अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे गुरुवार दि.२ रोजी दोन दिवसीय विद्वत परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि.३ रोजी या परिषदेचा समारोप होणार आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात ही परिषद होणार असून सकाळी साडेदहा वा. उद्घाटन होणार आहे. उद्घाटन सोहळ्यास इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक उर्जा मंत्री अतुल सावे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, कुलगुरु डॉ. विजय फुलारी तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी राज्यसभा सदस्य खासदार डॉ. भागवत कराड, लोकसभा सदस्य खा. संदिपान भुमरे, खा.डॉ. कल्याण काळे, विधान परिषद सदस्य आ. सतिष चव्हाण, आ. विक्रम काळे. विधान सभा सदस्य आ. अब्दुल सत्तार, आ. प्रशांत बंब, आ. प्रदीप जैस्वाल, आ. रमेश बोरनारे, आ. श्रीमती अनुराधा चव्हाण, आ. श्रीमती संजना जाधव तसेच श्रीमंत अमरजीत राजे बारगळ यांची उपस्थिती राहील.

  या दोन दिवसीय परिषदेचे नियोजन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी केले आहे.दोन दिवस तज्ज्ञांचे मार्गदर्शन दुपारी १२ वा. ज्येष्ठ विचारवंत लेखक रविंद्र मुळे यांचे बीज भाषण होणार असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित इतिहासाचा मागोवा घेतला जाणार आहे.     पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात दुपारी साडेबारा वा. हिंदवी स्वराज्य ते हिंदवी साम्राज्य या विषयावर सुधीर थोरात, दुपारी ३ वा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी आणि महिला सबलीकरण याविषयावर डॉ. नम्रता भोसले-मोहिते, दुपारी साडेतीन वा. रविंद्र सासमकर यांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी धार्मिक सांस्कृतिक पुनरुत्थान या विषयावर तर दुपारी ४ वा. डॉ. अशोक बांगर यांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी एक कुशल प्रशासक या विषयावर आपले विचार मांडतील. सायं. ५ ते ७ दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम होऊन पहिल्या दिवसाचे सत्र संपतील.

  दुसऱ्या दिवशी शुक्रवार दि.३ रोजी सकाळी ११ वा. डॉ. श्रीमती योगिता होके पाटील व गोरक्षनाथ अबुज यांचे मार्गदर्शन, दुपारी १२ वा. होळकर घराणे या विषयावर नवनाथ ढगे, दुपारी साडे १२ वा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर- कला आणि स्थापत्य या विषयावर रामभाऊ लांडे, दुपारी १ वा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी –सामाजिक समता याविषयावर डॉ. रमेश पांडव, दुपारी ३ वा. धनंजय धनगर हे मुक्तमंथन करतील, दुपारी ४ वा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे नाट्य श्रीमती अर्चना चितळे ह्या सादर करतील. अभ्यासक, इतिहास संशोधक व नागरीकांनी या दोन दिवसीय विव्दत परिषदेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय विभीषण चवरे यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

विशेष वृत्त-महिला व बाल विकास विभागाला बळ !‘महिला व बाल विकास भवन’( अहिल्याभवन ) उभारणीला मान्यता !एकाच छताखाली १३ विभागांच्या कार्यालयांची सोय

राज्य महोत्सवांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेचा ‘कलागणेश महोत्सव’ रसिकांच्या गर्दीत जल्लोषात साजरा..

vishwatmaklokswamivarta

हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त पूर्वतयारीचा आढावा

मुंबईकरांसाठी खुशखबर – बृहन्मुंबई महानगरपालिकेची नागरिकांसाठी  गृहनिर्माण लॉटरी जाहीर … आर्थिक दुर्बल घटक आणि कमी उत्पन्न गटासाठी या घरांची सोडत..

vishwatmaklokswamivarta

डॉ. बाबा आढाव यांचे संपूर्ण आयुष्य कष्टकरी, श्रमिक, गरीब, वंचित वर्गाकरिता समर्पित – उपमुख्यमंत्री अजित पवार ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; उपमुख्यमंत्र्यांकडून पार्थिवाचे अंत्यदर्शन

vishwatmaklokswamivarta

दार्जिलिंग परिसरातल्या पाऊस आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे मदतीचे आश्वासन आणि दार्जिलिंगमधील पूल दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त…

vishwatmaklokswamivarta