vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बी.ई.जी. मधून सेवानिवृत्त सैनिकांसाठी कोल्हापूर येथे 20 जुलैला संपर्क अभियान

बी.ई.जी. मधून सेवानिवृत्त सैनिकांसाठी कोल्हापूर येथे 20 जुलैला संपर्क अभियान

        सांगली, प्रतिनिधी: सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील बी.ई.जी. (BEG) मधून सेवानिवृत्त झालेले अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीर पत्नी, वीर माता व त्यांचे अवलंबीत यांच्यासाठी बी.ई.जी. पुणे येथून अधिकारी व कर्मचारी यांच्याद्वारे संपर्क अभियान (Outreach Programme) रविवार, दिनांक 20 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता महासैनिक दरबार हॉल, कसबा बावडा, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार (निवृत्त) यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

 

            जिल्ह्यातील बी.ई.जी. मधून सेवानिवृत्त झालेले अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीर पत्नी, वीर माता व त्यांच्या अवलंबितांना सैन्यातील सुविधा, नविन धोरणे व त्याबाबतच्या येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी संपर्क अभियान कार्यक्रमास उपस्थित राहून तक्रारीचे निवारण करुन घ्यावे. येणाऱ्या सर्व माजी सैनिक व त्यांच्या कुटूंबियांची दुपारच्या जेवणाची सोय केली असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

७.३७ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२६ ची परतफेड

आज तिरंगा रॅलीमध्ये नागरिकांनी मोठया सख्येंन सहभागी व्हावे. -जिल्हाधिकारी सतोंष पाटील 

जिल्हा युवा पुरस्कार सन 2023-24 व 2024-25 साठी अर्ज सादर करण्याकरिता दि.06 जून 2025 पर्यंत मुदतवाढ  

धारावी झोपडपट्टी पोलीस पंचायत कार्यालयास पोलीस अधिकाऱ्यांची भेट व गटचर्चा

जिल्ह्यातील ५० गावे आणि शंभर अंगणवाड्या स्मार्ट इंटेजिलंट व्हाव्यात – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

महिला बचत गटांच्या उत्पादित मालाच्या विक्रीसाठी सातारा शहरात मॉल उभारणार- ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे

vishwatmaklokswamivarta